Russian missile attack SAAM TV
देश विदेश

Russian missile attack: रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा हल्ला; एका रात्रीत 600 हून अधिक ड्रोन आणि मिसाइल्सचा मारा

Russia Ukraine war update: रशियाने युक्रेनवर 666 ड्रोन आणि मिसाइल्ससह मोठा हवाई हल्ला केला. युक्रेनने अनेक हल्ले रोखले, तरी काही लक्ष्यांवर स्फोट झाले. या घटनेमुळे युद्ध अधिक धोकादायक टप्प्यावर पोहोचल्याचं स्पष्ट झालं आहे.

Surabhi Jayashree Jagdish

युक्रेनमध्ये पुन्हा एकदा सायरन वाजले आणि रात्रीचा शांत अंधार क्षणात भीतीच्या वातावरणात बदलला. रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेलं युद्ध आता पुन्हा एकदा अधिक धोकादायक टप्प्यावर पोहोचल्याचं दिसतंय. 24 ते 25 एप्रिलच्या मध्यरात्री रशियाने हवाई हले केला, ज्यामुळे सगळीकडे तणावाचं वातावरण पसरलं.

युक्रेनच्या वायुसेनेनं दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला संध्याकाळी साधारण 6 वाजल्यापासून सुरू झाला आणि रात्रीभर सुरूच होता. एकूण 666 हल्ले करण्यात आले, ज्यात 47 मिसाइल्स आणि तब्बल 619 ड्रोनचा समावेश होता. एवढ्या मोठ्या प्रमाणावर एकाच वेळी हल्ला झाल्यामुळे परिस्थिती फारच गंभीर होती.

या हल्ल्यात 12 बॅलिस्टिक मिसाइल्स (Iskander-M आणि S-400), 29 Kh-101 क्रूज मिसाइल्स, 5 कॅलिबर मिसाइल्स आणि मोठ्या प्रमाणावर ड्रोन वापरण्यात आले. विशेष म्हणजे, इराणमध्ये बनवलेले शाहेद प्रकारातील कामिकाजे ड्रोन मोठ्या संख्येने वापरले गेले. हे ड्रोन थेट लक्ष्यावर जाऊन आदळतात आणि मोठा स्फोट घडवतात.

पण युक्रेननंही हार मानली नाही, त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. वायुसेनेच्या म्हणण्यानुसार, त्यांनी 610 टार्गेट्सना मोडून पाडलं. त्यात 30 मिसाइल्स आणि 580 ड्रोन पाडण्यात यश आलं. विशेष म्हणजे 26 Kh-101 आणि 4 कॅलिबर मिसाइल्स हवेतच उडवण्यात आले त्यामुळे मोठं नुकसान टळलं.

13 मिसाइल्सने अटॅक

तरीसुद्धा सगळे हल्ले रोखणं शक्य झालं नाही. काही मिसाइल्स आणि ड्रोन लक्ष्यावर पोहोचलेच. प्राथमिक माहितीनुसार, 13 मिसाइल्स आणि 36 ड्रोन आपलं लक्ष्य गाठण्यात यशस्वी ठरलेत. त्यामुळे देशभरातील 23 वेगवेगळ्या ठिकाणी स्फोट झाले आणि नुकसान झालं. याशिवाय पाडलेल्या ड्रोनचे तुकडे 9 ठिकाणी कोसळले, ज्यामुळे स्थानिक पातळीवरही नुकसान झालं. दरम्यान अजून 4 मिसाइल्सबाबत माहिती गोळा केली जातेय.

रशियाने हा हल्ला जमीन, समुद्र आणि हवा या तिन्ही मार्गांनी केला. काही मिसाइल्स मिलेरोवो, कुर्स्क आणि ब्रायंस्क या भागातून सोडण्यात आले होते तर काही कॅस्पियन समुद्र आणि क्रीमिया भागातून आल्याची माहिती आहे. म्हणजेच आता रशिया एकाच वेळी अनेक दिशांनी हल्ला करत असल्याचं स्पष्ट झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पुण्यात टँकरवर आता ऑनलाइन नजर, राज्यभर योजना राबवली जाणार, पाहा सरकरचा नेमका प्लान काय?

Samarth Movie: समर्थ रामदास स्वामींच्या विचारांची आधुनिक काळाशी सांगड; 'समर्थ' चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित

Maharashtra News Live Update:बारामतीत जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आगमन; शारदा प्रांगणात मुक्काम

Palazzo Design for Monsoon: पावसाळ्या कम्फर्टेबल आणि स्टायलिश लूकसाठी ट्राय करा हे ७ ट्रेंडी पलाझो डिझाइन्स

AI TECH : लवकरच बाजारात येणार ChatGPT-पावर्ड स्मार्ट स्पीकर , AI Assistant ची लुटता येणार मज्जा

SCROLL FOR NEXT