ropeway accident google
देश विदेश

झारखंडमध्ये १५०० फूट उंचावर रोपवेला अपघात; थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल

नरेश शेंडे

देवघर : झारखंडच्या (Jharkhand) देवघरमध्ये १५०० फूट उंचावर असलेल्या रोपवेचा अपघाताचा (Ropeway accident) व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पर्यटक ट्रॉलीतून प्रवास करत असताना समोरुन येणाऱ्या दोन ट्रॉली एकमेकांना धडकल्या. त्यानंतर ट्रॉलीमध्ये असेलेल्या पर्यटकांची एकच तारांबळ उडाली. अनेक पर्यटकांचा थरकाप झाल्याने त्यांनी आरडोओरडा करायला सुरुवात केली. तब्बल १५०० फूट उंचावर असलेल्या रोपवेच्या अपघातात अडकलेल्या पर्यटकांना वाचवण्यासाठी मोठं रेस्क्यू ऑपरेशन (Rescue operation) करण्यात आलं. हे रेस्क्यू ऑफरेशनमध्ये जवळपास ४८ तास सुरु होतं. ही घटना रविवारी सायंकाळी चार वाजता घडली असून अपघातात (Three people death) तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

व्हायरल झालेला व्हिडिओ अपघातपूर्वीच ट्रॉलीत बसलेल्या पर्यटकांनी शुट केला होता. उंचावर असलेल्या त्रिकूट पर्वतावर हा अपघात झाल्याचं या व्हिडिओमध्ये दिसतंय, दरम्यान, अपघात झाल्यावर रोपवेला जोरदार धक्का बसल्याने पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. अपघातानंतर सहा ट्ऱॉली हवेत अडकल्या होत्या. ज्यामध्ये जवळपास ५० पर्यटक प्रवास करीत होते. ज्यावेळी अपघात झाला तेव्हा काही पर्यटक जखमी झाले आणि एकाचा मृत्यू झाला. त्यानंतर आईटीबीपी, एनडीआरएफच्या जवान आणि स्थानिक लोकांनी ४५ तासांचं बचावकार्य करुन पर्यटकांना सुखरूप सुटका केली. तीन जणांचा या अपघातात मृत्यू झाला. मंगळवारी दोरीवरुन एक महिला खाली पडली आणि तिलाही आपला जीव गमवावा लागला.

पर्यटकांनी सांगितली आपबीती

" अपघातामुळे जेव्हा आम्ही ट्रॉलीत अडकलो होतो आमच्यातील कुणीच वाचणार नाही असं वाटत होतं. आमचा सर्वांचा मृत्यू होईल, अशी भीती होती. मात्र, रेस्क्यू टीमने आमचा जीव वाचवला. अशी माहिती बिहारमधील मधुबनी जिल्ह्यातील एका नागरिकानं दिलीय. दरम्यान, हा अपघात झाल्यानंतर केंद्रीय गृह सचिवांकडून सर्व राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना मार्गदर्शन सूचना देण्यात आल्या आहेत. रोपवेसाठी एक एसओपी आणि योजना बनवण्यासाठीही राज्यांना सूचना दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : पोस्टल मतदानात मविआ आणि महायुतीत काँटे की टक्कर

Horoscope Today: तूळ राशीच्या लोकांना आज जीवनसाथीकडून सहकार्य मिळेल, वाचा तुमचे राशिभविष्य

Assembly Election Results : भाजप कार्यालयाबाहेर जय्यत तयारी, पाहा Video

Horoscope Today: कोणत्या राशींसाठी आजचा दिवस असेल भाग्यशाली, वाचा राशीभविष्य

Maharashtra Election Results : कोण मुख्यमंत्री, कोण आमदार! विधानसभा निवडणूक निकालाआधीच झळकले विजयाचे बॅनर

SCROLL FOR NEXT