Kalyan Accident Saam tv
देश विदेश

Accident : हृदयद्रावक! बाप अन् ३ लेकींचा जागीच मृत्यू, चौथीची प्रकृती गंभीर, लग्नाला जाताना काळाचा घाला

Father and Three Daughters Killed : गुजरातच्या गोधराजवळ ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात. बाप आणि तीन मुलींचा जागीच मृत्यू, एक मुलगी गंभीर जखमी. कुटुंब लग्नासाठी प्रवास करत होते.

Namdeo Kumbhar

Father and daughters killed truck crash : तीन मुली अन् बापाचा भीषण अपघातात जागीच मृत्यू झालाय. चौथी मुलगी गंभीर जखमी झाली आहे. गुजरातमधील गोधराजवळ शुक्रावारी संध्याकाळी हा अपघात झाला. एक व्यक्ती आपल्या मुलींसोबत दुचाकीवरून निघाला होता, त्यावेळी भरधाव वेगात असणाऱ्या ट्रकने दुचाकीला उडवले. अपघात इतका भयंकर होता की दुचाकीवरून सर्वजण दूर फेकले गेले. तीन मुली आणि बापाचा जागेवरच मृत्यू झाला.

गोधरा-वडोदरा महामार्गावर बायपासजवळ तृप्ती हॉटेलजवळ शुक्रवारी भीषण अपघात झाला. एका भरधाव वेगातील ट्रकने मोटारसायकलला मागून धडक दिली. या अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. एक मुलगी गंभीर जखमी आहे. मुलीवर गोधरा येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ३६ वर्षीय रजेंद्र चौहान हे आपल्या चार मुलींसह मोटारसायकलवरून गोधरा बायपासजवळील सरंगपूर गावी लग्न समारंभासाठी निघाले होते. त्यावेळी तृप्ती हॉटेलजवळ गोधरा बायपासवर असताना एका ट्रकने त्यांच्या मोटारसायकलला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात जानू (९), मनीषा (१२) आणि वर्षा (१३) यांचा मृत्यू झाला. तर नयना (३) गंभीर जखमी आहे. नयनाची प्रकृती गंभीर असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

अपघात इतका भयंकर होता की ट्रकने जोरदार धडक दिल्यानंतर मोटारसायकलवरील सर्वजण रस्त्यावर पडले. आजूबाजूच्या प्रवाशांनी आणि स्थानिकांनी त्यांची तातडीने मदत केली. रजेंद्र आणि त्यांच्या चार मुलींना गोध्रा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर राजेंद्र आणि त्यांच्या तीन मुलींना मृत घोषीत केले. नयना हिच्यावर उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिवसेना ठाकरे गटाच्या अखिल चित्रे यांनी मंत्री नितेश राणे यांना डिवचले

BJP National President: भाजपला पहिल्यांदा मिळू शकतात महिला राष्ट्रीय अध्यक्ष, ३ नावं आहेत चर्चेत

Shirdi : साई संस्थानची बदनामी केल्यास फौजदारी गुन्हा दाखल होणार | VIDEO

Sara Tendulkar: सचिन तेंडुकरच्या लाडक्या लेकीचे नविन ग्लॅमरस फोटो तुम्ही पाहिलेत का?

New Electric Bike Launch : बाईक रायडर्ससाठी गुड न्यूज! फक्त २५ पैशांमध्ये १ किमी धावेल ही इलेक्‍ट्रिक टू-व्हीलर, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT