Rajnath Singh On Rajouri Attack Saam Tv
देश विदेश

Rajouri Attack: सैन्य दलांनी अधिक सतर्क राहावे आणि दहशतवादाबाबत शून्य सहिष्णुता बाळगावी: राजनाथ सिंह

Rajnath Singh On Rajouri Attack: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 27 डिसेंबर 2023 रोजी जम्मू आणि काश्मीरच्या सीमावर्ती भागाला भेट दिली आणि त्यांनी नियंत्रण रेषेवरील (एलओसी) सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला.

साम टिव्ही ब्युरो

Rajnath Singh On Rajouri Attack:

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 27 डिसेंबर 2023 रोजी जम्मू आणि काश्मीरच्या सीमावर्ती भागाला भेट दिली आणि त्यांनी नियंत्रण रेषेवरील (एलओसी) सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना सुरक्षेविषयी सध्याची परिस्थिती, घुसखोरी विरोधी अभियान आणि परिचालन सज्जता या गोष्टींची तपशीलवार माहिती देण्यात आली.दहशतवाद विरोधी कारवाया राबवताना येणाऱ्या आव्हानांशी संबंधित पैलूंवर राजनाथ सिंह यांनी क्षेत्रीय कमांडर्स बरोबर चर्चा केली. लष्करी कारवाईमध्ये व्यावसायिकता आणि योग्य कारवाई करण्याची सूचना केली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सैनिकांशी संवाद साधताना, संरक्षण मंत्र्यांनी दहशतवाद विरोधी कारवाईत शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहिली आणि या शूर वीरांच्या कुटुंबियां प्रति सह वेदना व्यक्त केली. सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन आवश्यक त्या सर्व उपाय योजना केल्या जात आहेत यावर भर देत, त्यांनी जखमी सैनिकांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी सदिच्छा व्यक्त केली. (Latest Marathi News)

सरकार सेना दलाच्या पाठीशी आहे , असे आश्वस्त करत राजनाथ सिंह यांनी सैनिकांचे अतुलनीय शौर्य आणि बलिदानासाठी देश त्यांचा सदैव ऋणी राहील, असे सांगितले. सशस्त्र दलांचे कल्याण हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगून, सुरक्षा आणि गुप्तचर चौकट अधिक मजबूत करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत, यावर त्यांनी भर दिला.

“भारतीय लष्कर हे सर्वसामान्य सैन्य नाही. सैनिक आमचे रक्षक आहेत. केवळ देशाचे हित जपणे नव्हे, तर लोकांची मने जिंकणे हे त्यांचे कर्तव्य आहे.” संरक्षण मंत्री म्हणाले. दहशतवादाबाबत शून्य सहिष्णुता असायला हवी, असा पुनरुच्चार करत भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी जवानांनी अधिक सतर्क राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

या भागातील अलीकडची घटना दुर्दैवी असल्याचे संरक्षण मंत्री म्हणाले आणि सर्व श्रेणींच्या दलांनी विशिष्ट तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्रस्थापित कार्यपद्धतींनुसार गुप्तचर माहितीवर आधारित कारवाई हाती घेण्याची सूचना त्यांनी केली. सुस्थापित एसओपी उल्लंघन झाले, तर सर्व कमांडर्सनी शून्य सहनशीलता बाळगावी असे आवाहन त्यांनी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Maharashtra News Live Update: आंबेगावच्या पोषण आहारावर ग्रामस्थांचा आक्षेप; काळवाडीत धान्याचे सॅम्पल घेऊन तपासणी सुरू

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

माजी मुख्यमंत्र्यांसह ४४ नेत्यांना मिळणार बुलेटप्रूफ जॅकेट्स; सरकारचा मोठा निर्णय, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT