Crime News Saam Tv
देश विदेश

Crime News: प्रेमाला नकार, तरुणाचं डोकं सटकलं; रागात तरुणीवर चाकूने वार करत केला अ‍ॅसिड हल्ला

Girl attacked with knife and acid: प्रेमाचा प्रस्ताव नाकारल्याने माथेफिरू आरोपीने मुलीवर चाकूने वार करत ॲसिड हल्ला केलाय. या धक्कादायक घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

Bhagyashree Kamble

प्रेमाचा प्रस्ताव नाकारल्याने माथेफिरू आरोपीने मुलीवर चाकूने वार करत ॲसिड हल्ला केलाय. ही धक्कादायक घटना आंध्र प्रदेशातील अन्नमय्या जिल्ह्यातील एका गावात घडली आहे. मुख्य म्हणजे मुलीचा साखरपुडा झाला होता. पोलिसांना शुक्रवारी या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तपासाला सुरूवात केली आहे. या संतापजनक घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

अन्नमय्या जिल्हा पोलिस अधीक्षक बी. कृष्णा राव म्हणाले, मदनपल्ली येथील रहिवासी गणेश (२४) याने शुक्रवारी सकाळी ७ वाजता पेरामपल्ली गावातील मुलीवर हल्ला केला. घटनेच्या वेळी मुलीचे पालक गुरे राखण्यासाठी गेले होते. पोलीस अधीक्षक म्हणाले, "त्या तरुणीचे नुकताच साखरपुडा झाला होता. तिने गणेशला सांगितले की तिला आता त्याच्यासोबत संबंध ठेवायचे नाहीत."

एसपी म्हणाले की, मुलीने सकाळी गणेशला तिच्या घरी बोलावले होते. गणेश संपूर्ण योजना आखून तिला भेटायला गेला होता. भेटीदरम्यान दोघांमध्ये वाद झाला. याच दरम्यान गणेशने तिच्यावर चाकूने हल्ला करत अंगावर ॲसिड ओतले.

मुलीवर ॲसिड ओतल्यानंतर आरोपी फरार झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीवर सात वेळा चाकूने वार करण्यात आले आहे. तसेच ॲसिड हल्ल्यात ती पूर्णपणे भाजली गेली. पोलिसांनी जखमी मुलीला उपचारासाठी बेंगळुरू येथील रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेचा अधिक तपास तसेच आरोपीचाही शोध पोलिस घेत आहेत.

या हल्ल्याचा निषेध करताना मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी अधिकाऱ्यांना हल्लेखोराविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. "पीडित व्यक्तीवर चांगल्या उपचारांसाठी सर्व पावले उचलली पाहिजेत," असे मुख्यमंत्र्यांनी एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे. "सरकार पीडिता आणि तिच्या कुटुंबासोबत उभे राहील," असंही मुखमंत्री म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याचे दर ऐतिहासिक उच्चांक गाठणार! प्रति तोळा २ लाखांच्या पार जाणार? वाचा

Youtuber Death: प्रसिद्ध युट्यूबरचा वयाच्या ३१ व्या वर्षी संशयास्पद मृत्यू; जंगलात आढळला मृतदेह, मनोरंजन सृष्टीत खळबळ

Russian model viral video: जवळ आला, हात लावण्याचा प्रयत्न केला आणि...! लगट करणाऱ्याला रशियन महिलेने शिकवला धडा

Messy Braid Hairstyle For Long Hair: लांब केसांवर शोभून दिसेल 'मेसी वेणी', लग्नात तुम्हीच दिसाल सुंदर

Instagram Down : अचानक इंस्टाग्राम झालं ठप्प, रील प्रेमींचा जीव टांगणीला, भन्नाट मीम्सचा पाऊस

SCROLL FOR NEXT