India Corona Update Saam Tv
देश विदेश

Corona Update: देशात 24 तासांत 2,86,384 नव्या रुग्णांची नोंद, 573 जणांचा मृत्यू

देशात काही दिवसांपूर्वी नव्या कोरोनाबाधितांची संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात घट होताना दिसत होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था: देशात काही दिवसांपूर्वी नव्या कोरोनाबाधितांची (corona) संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात घट होताना दिसत होती. पण मागील 2 दिवसांपासून परत एकदा नव्या कोरोनाबाधितांच्या (corona) संख्येमध्ये किंचित वाढ होताना दिसत आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी कालच्या नव्या कोरोनाबाधितांच्या तुलनेत देशातील आजच्या नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत 470 रुग्णांची वाढ होऊन मागील 24 तासांत 2 लाख 86 हजार 384 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. (India Corona Updates: Recorded 286384 new Corona patients in the country in 24 hours)

हे देखील पहा-

गेल्या 24 तासांत 573 रुग्णांच्या मृत्यू (Death) झाला असून 3 लाख 6 हजार 357 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशात 22 लाख 2 हजार 472 रुग्णांवर (patients) उपचार सुरू आहेत. रोजच्या पॉझिटिव्हिटी रेट 19.59 टक्के झाला आहे. आतापर्यंत 1 अब्ज 63 कोटी 84 लाख 39 हजार 207 लसीकरण (Vaccination) झाले आहे.

देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या – 4 कोटी 3 लाख 71 हजार 500

देशातील एकूण मृत्यूची संख्या – 4 लाख 91 हजार 700

देशातील एकूण रुग्ण बरे झालेल्यांची संख्या – 3 कोटी 76 लाख 77 हजार 328

देशातील एकूण सक्रीय रुग्णसंख्या – 22 लाख 2 हजार 472

देशातील एकूण चाचण्यांची संख्या – 72 कोटी 21 लाख 66 हजार 248

देशातील एकूण लसीकरणाची संख्या – 1अब्ज 63 कोटी 84 लाख 39 हजार 207

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Samruddhi Highway: समृद्धी महामार्गावर ठोकले खिळे, अनेक वाहनांचे टायर फुटले; नेमका प्रकार काय? पाहा VIDEO

Maharashtra Live News Update : नागपूर विभागात पाच भागात असणार वीजपुरवठा बंद

Pune Tourism : पुणे फिरण्याचा प्लान करताय? मग 'हे' ठिकाण लिस्टमध्ये ठेवाच

Raghav Juyal : राघव जुयालने लोकप्रिय अभिनेत्रीच्या थोबाडीत मारली? पाहा व्हायरल VIDEO मागचे सत्य

Mandale to Chembur Metro : मुंबईकरांची प्रतिक्षा संपणार; मंडाळे ते चेंबूर मेट्रो महिन्याच्या अखेरीस सुरु होण्याची शक्यता | VIDEO

SCROLL FOR NEXT