Interest Rate Hike Saam Tv
देश विदेश

ग्राहकांना दणका! RBI ने वाढवला रेपो दर, कर्जाचा हप्ता वाढणार

वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) अचानक धोरणात्मक दरात बदल केला

वृत्तसंस्था

वृत्तसंस्था: वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) अचानक धोरणात्मक दरात बदल केला आहे. यानंतर अनेक बँकांनी (bank) रेपो दर आधारित व्याजदर (EBLR) वाढवले ​​आहेत. ICICI बँकेने ८.१० टक्के आणि बँक ऑफ बडोदाने ६.९० टक्के केले आहे.

हे देखील पाहा-

व्याजदरवाढीची घोषणा

बँक ऑफ इंडिया (Bank of India) व बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) यांनीही रेपो दरात वाढ केल्यानंतर व्याजदर वाढवण्याची घोषणा केली आहे. महागाई (Inflation) नियंत्रणात ठेवण्यासाठी आरबीआयने रेपो दरात ०.४० टक्क्यांनी वाढ करून ४.४० टक्के करण्याची घोषणा केली. त्यानंतर बँकांनी हा निर्णय घेतला आहे.

कर्जे महाग होणार

EBLR वाढल्याने ग्राहकांसाठी वैयक्तिक कर्ज, वाहन कर्ज आणि गृहकर्ज महाग होणार आहे. आयसीआयसीआय बँकेने सांगितले की, 'रेपो दरासोबत आयसीआयसीआय-ईबीएलआर बदलले जात आहे. तो आता ८.१० टक्के होणार आहे. त्याची अंमलबजावणी ४ मे पासून करण्यात येणार आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदाने व्याजदरात बदल केला आहे. बँकेकडून असे सांगण्यात आले की, 'किरकोळ कर्जासाठी लागू असलेले BRLLR ५ मे २०२२ पासून ६.९० टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहे. यामध्ये RBI चा ४.४० टक्के रेपो रेट आणि २.५० टक्के 'मार्कअप' समाविष्ट आहे.

बँक ऑफ इंडियाने ५ मे २०२२ पासून रेपो दरात बदल करून RBLR ७.२५ टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. सेंट्रल बँकेनेही RBLR ०.४० टक्क्यांनी वाढवून ७.२५ टक्के केले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: चंदीगडमध्ये भाजप कार्यालयाबाहेर स्फोटासारखा आवाज; तपासासाठी एफएसएल टीम घटनास्थळी दाखल

सर्वात मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीत मोठी उलथापालथ; प्रफुल्ल पटेलांना कार्याध्यक्षपदावरून हटवलं?

Places To Avoid Visit In Summer: एप्रिल- मे महिन्यात या 3 ठिकाणी बिलकूल भेट देऊ नका, गर्मीमुळे व्हाल हैराण

Borivali Tourism : चला वीकेंडला फिरायला! उन्हाळ्यात थंडावा देणारी 'बोरीवली'तील ५ सुंदर पिकनिक स्पॉट

Crime: सावत्र बाप करायचा लैंगिक अत्याचार; वैतागून घर सोडून पळालेल्या मुलीवर दोघांकडून सामूहिक बलात्कार

SCROLL FOR NEXT