Bengluru's Rameshwaram Cafe Bomb Blast: The NIA has Announced a Reward of Rs 10 Lakh for the Person who Gave Info About Bomber Saam Tv
देश विदेश

Bengluru Cafe Bomb Blast: बेंगळुरू बॉम्बस्फोटातील आरोपींवर 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर, एनआयएने फोटो केला प्रसिद्ध

Update on Bengluru's Rameshwaram Cafe Bomb Blast: बेंगळुरूमधील रामेश्वरम कॅफेमध्ये आयईडी बॉम्ब पेरणाऱ्या व्यक्तीवर एनआयएने 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

Satish Kengar

Rameshwaram Cafe Bomb Blast Update News:

बेंगळुरूमधील रामेश्वरम कॅफेमध्ये आयईडी बॉम्ब पेरणाऱ्या व्यक्तीवर एनआयएने 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. हा कमी तीव्रतेचा आयईडी स्फोट होता. ज्यात कॅफेमध्ये बसलेले 10 लोक गंभीर जखमी झाले होते.

एनआयएने आरोपीचे स्केच तयार केले असून त्याच्या नावाचे पोस्टर्स जारी करण्यात आले आहे. वाँटेडच्या पोस्टसोबतच त्याच्याबद्दल माहिती देणाऱ्यास 10 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल, असे एनआयएने जाहीर केले आहे. याशिवाय माहिती देणाऱ्या व्यक्तीची ओळखही उघड केली जाणार नाही, असंही सांगण्यात येत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या घटनेत अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणी केंद्रीय गुन्हे शाखा आणि एनआयए दोन्ही तपासात गुंतले आहेत. मंगळवारी गृह मंत्रालयाच्या आदेशानंतर एनआयएने या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारली आहे.  (Latest Marathi News)

याप्रकरणी कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर म्हणाले होते की, शहर पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. ते लवकरच या प्रकरणाचा खुलासा करणार आहे. या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू आहे. स्फोटानंतर रामेश्वरम कॅफे बंद असून आता ते ८ मार्चला उघडणार आहे.

दरम्यान, बेंगळुरूच्या या प्रसिद्ध कॅफेमध्ये १ मार्च रोजी जेवणाच्या वेळी स्फोट झाला होता. या स्फोटात १० जण गंभीर जखमी झाले आहेत. मात्र यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. या प्रकरणाचा तपास पुढे जात असताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्फोटाच्या तासाभरापूर्वी एक तरुण कॅफेमध्ये आल्याचे समोर आले. तो तेथे काही मिनिटे थांबला आणि नंतर एक बॅग मागे ठेवून निघून गेला ओटा. ज्या बॅगेत टायमर लावला होता. त्या बॅगेत आयईडी होते, असं सांगण्यात येत आहे. आरोपींनी कॅफेमध्ये इडलीची प्लेट मागवली होती.

मात्र ऑर्डर यायच्या आधीच ते तिथून निघून गेले होते. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास यंत्रणेने त्याचे स्केच तयार करून त्याचे फोटो प्रसिद्ध केले आहे. आरोपीचे वय ३० ते ४० वर्षांच्या दरम्यान असल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Relationship Tips : रिलेशनशिपमध्ये सतत भांडणं का होतात?

Maharashtra Politics: ठाकरे ब्रॅंड असता, तर बाळासाहेब असतानाच 288 आमदार आले असते - संजय गायकवाड|VIDEO

Lucky Zodiac Signs: 'या' 5 राशींना पावणार विठुराया; संकटं दूर होतील घरात येईल लक्ष्मी

Maharashtra Live News Update: CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पंढरपुरात आरोग्यवारी सोहळा

Boondi Ladoo Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा टेस्टी बुंदी लाडू

SCROLL FOR NEXT