Ram Mandir Ayodhya Saam Digital
देश विदेश

Ram Mandir Ayodhya: मोठी बातमी! श्रीरामाची मूर्ती अयोध्येकडे रवाना, अवघा देश राममय

Ram Mandir Ayodhya Update: विवेक सृष्टी ट्रस्टच्या कार्यलयातून रामलल्लाची मूर्ती मंदिराच्या दिशेने रवाना झाली आहे. रामलल्लाला गर्भगृहात स्थापन करण्यात येणार आहेत. काही वेळातच रामाची ही मूर्ती अयोध्येत पोहोचणार आहे. त्यानंतर धार्मिक विधी सुरू होतील.

Sandeep Gawade

Ram Mandir Ayodhya

येत्या २२ जानेवारीला अयोध्येत राम मंदिराची प्रतिष्ठापणा होत असून अवघा देश राममय झाला आहे. सगळीकडे रामलल्लाचा जयघोष सुरू आहे. अयोध्येत होणाऱ्या या भव्य सोहळ्यासाठी संपूर्ण देश सज्ज झाला असून विवेक सृष्टी ट्रस्टच्या कार्यलयातून रामलल्लाची मूर्ती मंदिराच्या दिशेने रवाना झाली आहे. रामलल्लाला गर्भगृहात स्थापन करण्यात येणार आहेत. काही वेळातच रामाची ही मूर्ती अयोध्येत पोहोचणार आहे. त्यानंतर धार्मिक विधी सुरू होतील.

ॲड. प्रकाश आंबेडकर राम मंदिर उद्घाटनाला जाणार नाहीत

अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर जाणार नसल्याची माहिती त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, भाजप-आरएसएसने आपल्या निवडणूक फायद्यासाठी धार्मिक कार्यक्रमाचा वापर केला आहे.

माझे आजोबा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चेतावणी दिली होती की, "जर पक्षांनी देशापेक्षा महत्त्व आपल्या धर्म, पंथाला दिलं, तर आपलं स्वातंत्र्य दुसऱ्यांदा धोक्यात येईल आणि कदाचित कायमचे गमावले जाईल." माझ्या आजोबांची भीती आज खरी झाली आहे. "देशापेक्षा जास्त पंथाला महत्वाचं मानणाऱ्या " भाजप-आरएसएसने आपल्या राजकीय फायद्यासाठी धार्मिक कार्यक्रमाचा वापर केला आहे. असंही त्यांनी म्हटले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मंत्रालय परिसरात झाडाची फांदी पडून पोलीस कॉन्स्टेबल जखमी

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या ३ सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, 'वीकेंड का वार'ला कोण जाणार घराबाहेर?

Aadhaar Card Update : आधार कार्डधारकांसाठी मोठी बातमी! UIDAIने बदलली Face Authenticationची पद्धत, असा होणार फायदा

Gold Rate : गणेशोत्सवात सोनं खरेदीदारांना दिलासा! १० तोळे ९२०० रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22k, 24k, 18k चे आजचे ताजे दर

Chocolate Modak vs Mawa Modak: चॉकलेट मोदक की मावा मोदक? यंदाच्या गणेशोत्सवात लहान मुलांसाठी बनवा हे दोन्ही मोदक

SCROLL FOR NEXT