Rakesh Tikait
Rakesh Tikait ANI
देश विदेश

Rakesh Tikait : राकेश टिकैत यांच्यावर बंगळुरूत शाईफेक; पत्रकार परिषदेत मोठा राडा

साम टिव्ही ब्युरो

बंगळुरू : कर्नाटकात (karnataka) शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांच्यावर काही लोकांनी हल्ला केल्याचे समोर आले आहे. राकेश टिकैत यांचे सुरक्षा रक्षक असतानाही हा प्रकार घडला आहे. राकेश टिकैत यांच्यावर आधी माइकने हल्ला करण्यात आला,त्यानंतर एका व्यक्तीने शाईफेक केल्याची माहिती समोर आली आहे. (Rakesh Tikait Latest News In Marathi )

हे देखील पाहा -

कर्नाटकात शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यावर पत्रकार परिषदेत काही लोकांनी हल्ला केला. यावेळी एका व्यक्तीने त्यांच्यावर शाईफेक केली. या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी खुर्च्या एकमेकांना फेकून मारल्या आहेत. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. स्थानिक शेतकरी नेते चंद्रशेखर यांच्या समर्थकांनी हा हल्ला केला असल्याचे माहितीत समोर आले आहे. कर्नाटकात शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी माध्यमांशी संवाद साधत होते. त्यावेळी त्यांनी चंद्रशेखर यांच्यावर टीका केली.

त्यावेळी राकेश टिकैत म्हणाले, चंद्रशेखर यांच्याशी आमचं काही देणं घेणं नाही. चंद्रशेखर हे भ्रष्ट आहेत'. या विधानामुळे चंद्रशेखर यांचे समर्थक भडकले. त्यानंतर उपस्थित चंद्रशेखर यांच्या समर्थकाने टिकैत यांच्यावर शाईफेक केली. त्यानंतर एकच राडा घटनास्थळी झाला. त्यावेळी टिकैत आणि चंद्रशेखर यांचे कार्यकर्ते आपापसात भडकले. खुर्च्यांही एकमेकांवर त्यांनी फेकल्या. दरम्यान टिकैत समर्थकांनी शाईफेक करणाऱ्याला पकडले आहे. या घडललेल्या प्रकारानंतर टिकैत यांनी कर्नाटक पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sharad Pawar News: शरद पवारांची प्रकृती अस्वस्थ, उद्याचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द

IPL 2024 : जडेजाच्या ऑलराउंडर खेळीने पंजाबचं प्लेऑफचं स्वप्न भंगलं; Points Table मध्ये CSKची टॉप-३ मध्ये एंट्री

Prajwal Revanna: प्रज्वल रेवन्नाविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी, जाणून घ्या काय आहे या नोटीसचा अर्थ

Maharashtra Politics 2024 : आम्ही कायम भांडत रहावं आणि...; आदित्य ठाकरेंच्या आरोंपांवर दीपक केसरकरांचा पलटवार

Today's Marathi News Live : उजनी धरणातून 10 मे रोजी सोलापूर शहरासाठी पाणी सोडण्यात येणार

SCROLL FOR NEXT