Rajkot Game Zone Fire Saam Tv
देश विदेश

Rajkot Game Zone Fire: राजकोट गेमिंग झोनच्या मालकासह तिघांना अटक, आग भडकण्यामागचं कारणही आलं समोर

Rajkot TRP Gaming Zone: गुजरात पोलिसांनी गेमिंग झोनचे मालक युवराज सिंह सोलंकी, व्यवस्थापक नितीन जैन आणि मॅनेजर राहुल राठोडला शनिवारी रात्री उशिरा अटक केली. या घटनेचा तपास करण्यासाठी गुजरात पोलिसांनी एसआयटीची स्थापना केली आहे.

Priya More

राजकोट गेमिंग झोन अग्नितांडवात (Rajkot Game Zone Fire) आतापर्यंत ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. या आगीच्या घटनेच्या अवघ्या काही तासांमध्येच गुजरात पोलिसांनी गेमिंग झोनचे मालक युवराज सिंह सोलंकी, व्यवस्थापक नितीन जैन आणि मॅनेजर राहुल राठोडला शनिवारी रात्री उशिरा अटक केली. या घटनेचा तपास करण्यासाठी गुजरात पोलिसांनी एसआयटीची स्थापना केली आहे. पोलिसांकडून याप्रकरणाचा कसून तपास सुरू आहे.

गुजरातच्या राजकोटमधील एका शॉपिंग मॉलमधील गेमिंग झोनला शनिवारी दुपारी साडेचारच्या सुमारस भीषण आग लागल्याची घटना घडली. या घटनेनंतर तब्बल सहा तासांपेक्षा जास्तवेळ आगी विझवण्याचे काम आणि बचावकार्य सुरू होते. या आगीमध्ये आतापर्यंत ३५ पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेमध्ये मृत्यू झालेल्यांमध्ये १२ लहान मुलांचा समावेश आहे. या आगीमध्ये जखमी झालेल्यांवर गुजरातच्या वेगवेगळ्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरात सरकारने एसआयटीला ७२ तासांच्या आतमध्ये ९ सूत्री रिपोर्ट सादर करण्यास सांगितले. ५ सदस्यांच्या एसआयटी टीमला १० दिवसांत सविस्तर रिपोर्ट द्यायचा आहे. या एसआयटी टीमला तात्काळ राजकोटला जाऊन तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एसआयटीच्या रिपोर्टनंतरच ही आग नेमकी कशी आणि कशामुळे लागली या मागचे कारण समोर येईल.

प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, आग ३० ते ४० सेकंदामध्ये संपूर्ण परिसरात पसरली. या गेमिंग झोनमध्ये अनेक लहान मुलं आणि काही मोठे व्यक्ती गेम खेळत असतानाच ही घटना घडली. राजकोटमधील हा गेमिंग झोन तयार करण्यासाठी धातू आणि फायबर शीटचा वापर करण्यात आला होता. जोरदार वाऱ्यामुळे आग भडकत गेली आणि या गेमिंग झोनचा अनेक ठिकाणचा भाग खाली पडला.

महत्वाचे म्हणजे या गेमिंग झोनमध्ये दुरूस्ती आणि नूतनीकरणाचे काम देखील सुरू होते. त्यामुळे प्लाय आणि लाकडाचे तुकडे इकडे तिकडे पडले होते. याचमुळे आग वाढत गेली. फायबरमुळे आग वाढत गेली आणि या आगीने क्षणात रौद्ररुप धारण केले. त्यामुळे या गेमिंग झोनमध्ये अडकलेल्यांना स्वत:ला वाचवण्याची संधीही मिळाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, फायर सेफ्टीसाठी कोणत्याही प्रकारची एनओसी न घेता हा गेम झोन सुरू होता. या गेम झोनमध्ये जवळपास १००० ते १५०० लिटर पेट्रोल आणि १५०० ते २००० लिटर डिझेल ठेवले होते. त्यामुळे या गेमिंग झोनला अवघ्या काही सेकंदात आगीने विळखा घातला. ही आग इतकी भीषण होती की यामध्ये संपूर्ण गेमिंग झोन जळून खाक झाला. दरम्यान, या आगीमध्ये मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख रुपये आणि जखमींना ५० हजारांची मदत सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Iran Israel war : तेलाचा खेळ बदलला! रशियाचा वाटा घटला, आता भारताला इंधन कुठून मिळणार?

ICC T20 WC 2026: विश्वविजेत्या टीम इंडियावर पैशांचा वर्षाव; BCCI कडून १३१ कोटींचं बक्षीस

Maharashtra Live News Update : कोल्हापुरातील कमर्शियल गॅस वितरण बंद

Narayanpet Saree Types: लग्नसराईत यावेळी खरेदी करा नारायणपेठ साडी, पाहा या ७ ट्रेंडी बजेटमध्ये असलेल्या डिझाईन्स

Rajya Sabha Election: शरद पवार, रामदास आठवलेंसह २६ जण बिनविरोध खासदार, 'या' ११ जागांसाठी होणार निवडणूक

SCROLL FOR NEXT