Ahmedabad Plane Crash update : Saam tv
देश विदेश

Ahmedabad Plane Crash : २ दिवसांपूर्वी नोकरीचा राजीनामा, लंडनला सेटल व्हायचा निर्णय; विमान अपघातात हसतं खेळतं कुटुंब क्षणात संपलं

Ahmedabad Plane Crash update : विमान अपघातात राजस्थानमधील हसतं खेळतं कुटुंब क्षणात संपलं. त्यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Vishal Gangurde

अहमदाबादच्या विमान अपघातात राजस्थानच्या बांसवाडाच्या जिल्ह्यातील कुटुंबाचाही दुर्दैवी अंत झाला आहे. मृतांमध्ये बांसवाडामध्ये राहणारे प्रतीक जोशी यांचं संपूर्ण कुटुंबाचा समावेश आहे. प्रतीक जोशी यांनी सहा वर्षांआधी लंडनला बस्तान मांडलं होतं. त्यानंतर आता प्रतीक त्यांची पत्नी आणि तीन मुलांना घेऊन लंडनला निघाले होते. लंडनला जाण्याआधीच त्यांच्या कुटुंबीयांवर काळाने झडप घातली आहे.

प्रतिक जोशी यांची पत्नीचं नाव डॉ. कोमी व्यास असं आहे. डॉक्टर पत्नी कोमी यांनी दोन दिवसांपूर्वी नोकरीचा राजीनामा दिला होता. नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर लंडनला सेटल व्हायचा जोशी कुटुंबाचा मानस होता. प्रतिक जोशी यांना तीन मुले होती. दोन जुळे मुले होती. तर एक मुलगी होती. लंडनला स्थायिक होण्यासाठी संपूर्ण कुटुंब निघालं होतं. प्रतिक यांनी खूप वर्षाआधीच कुटुंबाला लंडनला घेऊन जायचा प्लान केला होता. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळं होतं. विमान अपघातामुळे काही क्षणात संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी अंत झाला.

अपघातात संपूर्ण कुटुंबाचा अंत झाल्याची माहिती कळताच नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे. ते राहत असलेल्या परिसरात शोककळा पसरली आहे. प्रतिक आणि कोमी दोघे सुशिक्षित आणि मेहनती जोडपे होते.

राजस्थान बांसवाडा येथील प्रतिक जोशी यांच्या कुटुंबातील पाच लोकांचा मृत्यू झाला. तर उदयपूरचे ४ जण आणि बालोतराच्या खुशबू राजपुरोहित यांचा मृत्यू झाल्याचा वृत्ताला दुजारा मिळाला आहे. उदयपूरचे मार्बल व्यवसायिक पिंकू मोदी यांचा २४ वर्षीय मुलगा शुभ, २२ शगुन मोदी यांच्यासहित रुंडेडा गावातील वर्दी चंद मेनारिया आणि प्रकाश मेनारिया यांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालन्यात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका

Fort In Mumbai : मुंबईच्या इतिहासाचा साक्षीदार, वांद्रेपासून हाकेच्या अंतरावर वसलाय 'हा' किल्ला

Petrol- Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका, ७ दिवसात काय काय महागले?

Weight Loss Drinks: वजन कमी करायचं आहे? मग या ७ ड्रिंक्सपैकी एक ड्रिंक पिऊन करा झटपट वजन कमी

Musician Death: भारतीय संगीताचा अनमोल ठेवा हरपला; ज्येष्ठ तबला वादक काळाच्या पडद्याआड, संगीतविश्व शोकसागरात

SCROLL FOR NEXT