Two Women Wedding  saam tv news
देश विदेश

Viral News : विद्यार्थीनीच्या प्रेमात आकंठ बुडाली शिक्षिका, लिंग प्रत्यारोपण करून बांधली लग्नगाठ

एका सरकारी शाळेतील शिक्षिकेने आपल्याच विद्यार्थिनीशी लग्न केलं.

Satish Daud

Two Women Love Story : प्रेम हे आंधळं असतं असं नेहमी म्हटलं जात. प्रेमासाठी लोकं वाट्टेल ते करतात. याचाच प्रत्यय आणणारी एक अनोखी घटना समोर आली आहे. एका सरकारी शाळेतील शिक्षिकेने आपल्याच विद्यार्थिनीशी लग्न (Marriage) केलं. यासाठी शिक्षिकेने चक्क लिंग प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली. यानंतर दोघींनीही आपला संसार थाटला. राजस्थानमधील शिक्षिका आणि विद्यार्थीनीची ही अनोखी लव्हस्टोरी सध्या चर्चेचा (Viral News) विषय ठरते आहे.

राजस्थानातील (Rajasthan) भरतपूर येथील डीग परिसरात राहणारी मीरा नागला ही महिला सरकारी शाळेत शिक्षिका आहे. याच गावात राहणारी कल्पना सुद्धा त्याच शाळेतील विद्यार्थिनी आहेत. कल्पना ही एक उत्तम खेळाडूपटू असून तिला तीनवेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

दोहीघी एकाच शाळेत असल्याने शिक्षिका मीरा आणि कल्पना यांच्यात प्रेमाचे सूत जुळले. मीरा आणि कल्पना यांच्यातील प्रेम इतके वाढले की, दोघींनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, दोघींचे लिंग एकच असल्यामुळे लग्न करण्यात अडथळे येत होते. त्यामुळे 2019 मध्ये मीराने लिंग बदलण्याचा निर्णय घेतला.

यासाठी मीराने लिंग प्रत्यारोप शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेनंतर मीरा ही पुरूष बनली. नंतर दोघांनी आनंदाने लग्न केलं. विशेष बाब म्हणजे दोघींकडच्या कुटुंबियांनी याला आडकाठी केली नाही. लग्नानंतर मीराचे नाव आरव ठेवण्यात आले. तिला चार मोठ्या बहिणी असून चारही जणींची लग्न झाली आहेत.

आरव कुंतल सांगते की, ‘मी महिला कोट्यातून सरकारी शाळेत शिक्षिका पदावर रुजू झाले. माझ्या शाळेत शिकणारी कल्पना ही मुलगी उत्तम कबड्डीपटू होती. मी माझे लिंग बदलले, त्यामुळे कल्पनाने मला पाठिंबा दिला. दोन्ही कुटुंबांमध्ये पूर्वीपासूनच खूप घरोबा होता. कुटुंबियांनी लग्नाला होकार दिला. सध्या नोकरीच्या कागदपत्रात नाव बदलण्यासाठी आणि स्त्रीचे लिंग जुळवण्यासाठी खूप त्रास होत आहे.’

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs South Africa: वर्ल्ड चॅम्पियन्सचा नाद करायचा नाय! भारताचा द.आफ्रिकेवर मोठा विजय; ३-१ ने मालिका जिंकली

IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

SCROLL FOR NEXT