Rajasthan News Saam Digital
देश विदेश

Rajasthan News: राजस्थानमध्ये दोन गटात राडा, तुफान दगडफेक

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Rajasthan News

राजस्थानमध्ये आज विधानसभेच्या १९९ जागांसाठी मतदान होत आहे. राज्यभर शांततेत मतदान पार पडत असताना फतेपूर शेखावटीमधून दोन गटात तणाव निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. तणावातरम्यान दोन्ही गट एकमेकांना भिडल्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि दोन्ही बाजूंनी तुफान दगडफेक करण्यात आली. दरम्यान पोलीस आणि निमलष्करी दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.

जवळपास तासभर हा राडा सुरू होता. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांना पाहून दगडफेक करणाऱ्यांनी तेथून पळ काढला. तासभर चाललेल्या या गोंधळामुळे मतदान थाबवण्यात आले होते. दरम्यान तणाव निवळल्यानंतर पुन्हा मतदान सुरू झाले. दोन्हीकडून झालेल्या दगडफेकीमुळे रस्त्यावर दगडांचा खच पडला होता. लोक घराच्या छतावरून देखील दगडफेक करताना दिसून आले. सध्या घटनास्थळी पॅरामिलीटरीचे जवान तैनात करण्यात आले आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राजस्थानमध्ये आज मतदान होत आहे. विधानसभेच्या २०० जागापैकी १९९ जागांवर मतदान प्रक्रीया सुरू आहे. काँग्रेसच्या उमेदवाराचे निधन झाल्यामुळे एका मतदारसंघातील मतदान स्थगित करण्यात आले आहे. दरम्यान मतदान शांततेत पार पाडवे यासाठी १ लाख २२९० सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. त्यामध्ये ६९, ११४ पोलीस, ३२, ८७६ होमगार्ड, फॉरेस्ट गार्ड, आरएसी आणि ७०० सीआरपीएफ जवानांचा समावेश आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांचा वेगवान आढावा

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

SCROLL FOR NEXT