Crime News
Crime News Yandex
देश विदेश

Rajasthan News : दारुसाठी नवऱ्याचं धक्कादायक कृत्य; बायकोने पैसे न दिल्याने ३ महिन्यांच्या बाळाला छतावरून फेकलं

साम टिव्ही

Rajasthan Latest News:

राजस्थानच्या सीकरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. दारुसाठी नवऱ्याने धक्कादायक कृत्य केल्याचा प्रकार केला आहे. दारुसाठी पैसे न दिल्याने नवऱ्याने तीन महिन्यांच्या पोटच्या मुलांना छतावरून फेकल्याचा धक्कादायक कृत्य केलं आहे. बाळाला छतावरून फेकून दिल्यानंतर त्याचा रुग्णालयात दाखल केल्यानंतर मृत्यू झाला. या घटनेनंतर बायकोने नवऱ्याच्या विरोधात हत्येचा गुन्हा केल्याची तक्रार दिली. (Latest Marathi News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरुख जालूपुरा हा जयपूर येथे राहतो. पण गेल्या ८ महिन्यांपासून तो सीकरमध्ये सासरी राहत आहे. शाहरुखने तिच्या पत्नीकडून दारुसाठी पैसे मागितले. मात्र, शाहरुखने पैसे देण्यास नकार दिला. बायकोने दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने शाहरुखने रागाच्या भरात ३ महिन्यांच्या बाळाला छतावरून फेकून दिलं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बाळाला छतावरून फेकून दिल्यानंतर नातेवाईकांनी बाळाच्या दिशेने धाव घेतली. त्यानंतर बाळाला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी बाळाला मृत घोषित केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल एका व्यक्तीने ३ महिन्याच्या बाळाची छतावरून फेकून हत्या केली. बायकोच्या तक्रारीनंतर नवऱ्याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. बाळाच्या आईने पोलिसांत धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी बाळाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. आतापर्यंत पोलिसांनी आरोपीला अटक केलेली नाही.

हरियाणात व्यावसायिकाची गोळ्या झाडून हत्या

हरियाणात गोळीबार झाल्याची घटना घडली. हरियाणातील रोहतक भागात गोळीबार झाला. या घटनेत व्यावसायिकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. अज्ञातांनी व्यावसायिकावर १५ ते १६ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या गोळीबारात व्यावसायिकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Milk: रात्री झोपण्यापूर्वी दूध पिणे म्हणजे आजारांना आमंत्रण; शरीरावर होतो दुष्परिणाम

Maharashtra Lok Sabha Voting Live: मुख्यमंत्री शिंदे यांचा अचानक मीरा-भाईंदर शहरात दौरा

Shivrajyabhishek Sohala 2024 : शिवराज्याभिषेक सोहळ्याला आचारसंहितेचा अडसर? सरकारने मार्ग काढावा : संभाजीराजे

Red Saree Look: लाल साडीत खुललं अभिनेत्रीचं मराठमोळं सौंदर्य; Photo पाहा

Dhule Loksabha Election: मतदान केंद्रावर उघडपणे भाजपचा प्रचार; राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा आक्षेप

SCROLL FOR NEXT