Rajasthan Brothers Love News Saamtv
देश विदेश

Rajasthan News: लहान भावाचा मृत्यू, तासाभरात मोठ्यानेही जीव सोडला; 'बंधुप्रेम' पाहून अख्ख गाव गहिवरलं

Rajasthan Brothers Love Heart Touching Story: चौघांमधील दोन भावांचा काही तासांच्या अंतरात मृत्यू झाला. यामधील तिसऱ्या भावाच्या मृत्यूचे कारण ऐकून सगळेच हळहळ व्यक्त करत आहेत.

Gangappa Pujari

Rajasthan News:

क्षुल्लक कारणावरुन एकत्र वाढलेले, खेळलेले बागडलेले सख्खे भाऊच पक्के वैरी झाल्याच्या अनेक घटना आपल्या आजुबाजूला पाहायला, ऐकायला मिळतात. संपत्तीसाठी, जमिनीच्या एका तुकड्यासाठी सख्खे भाऊ एकमेकांचे जीव घ्यायलही मागे पुढे पाहत नाहीत, मात्र राजस्थानमध्ये याला अपवादात्मक घटना समोर आली आहे. कलयुगाच्या राम- लक्ष्मणाची ही हृदयस्पर्शी कहाणी ऐकून तुमचेही डोळे पाणावतील. काय आहे हे प्रकरण? जाणून घ्या सविस्तर.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

हे संपूर्ण प्रकरण आहे, राजस्थानच्या पाली (Pali) जिल्ह्यातलं. पाली जिल्ह्याच्या रुपवास गावात चार भावांचं अनोख्या प्रेमाची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा होताना दिसत आहे. या चौघांमधील दोन भावांचा काही तासांच्या अंतरात मृत्यू झाला. यामधील तिसऱ्या भावाच्या मृत्यूचे कारण ऐकून सगळेच हळहळ व्यक्त करत आहेत.

चार भावांच्या प्रेमाची चर्चा!

रुपवास गावात चार भाऊ एकत्रित आपल्या कुटुंबासोबत आनंदाने राहतात. या चौघांमध्ये ज्येष्ठ बंधू बुधाराम हे सुमारे नव्वद वर्षांचे होते. त्यांच्यानंतर मंगलराम, तिसऱ्या क्रमांकाचा भाऊ दुर्गाराम आणि सर्वात लहान भाऊ मांगीलाल. या सर्वांचे वय 90 ते 75 दरम्यान आहे. या चारही भावांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते. त्यांच्या बंधुप्रेमाची सर्वत्र चर्चा आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लहान भावाच्या मृत्यूनंतर मोठ्यानेही जीव सोडला...

मात्र काही दिवसांपुर्वीच त्यांच्या घरावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला.चौघांमधील तिसरा भाऊ दुर्गाराम यांची प्रकृती काही दिवसांपूर्वीच खालावली होती. कुटुंबीयांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले असता मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला. दुर्गाराम यांच्या मृत्यूनंतर मोठा भाऊ बुधाराम प्रचंड दुःखी झाला. धाकटा भाऊ आपल्याला सोडून कायमचा निघून गेल्याचे समोर आल्यावर बुधारामची प्रकृतीही ढासळली. कुटुंबियांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले मात्र त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

एकाच चितेवर अंत्यसंस्कार..

तासाभरात दोन भावांच्या निधनाचे वृत्त पसरताच आजूबाजूच्या गावातील लोकही हळहळ व्यक्त करु लागले. दोघांवर एकत्र अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यसंस्काराला परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अंत्यसंस्काराला आलेला प्रत्येक जण कलयुगातील राम- लक्ष्मण, असे म्हणत आपले दुःख व्यक्त करत असल्याचे पाहायला मिळाले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मविआनं सरकारला पाठवलं 15 प्रश्नांचं पत्र; उत्तर देण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी काढल्या शुद्धलेखनाच्या चुका

चड्डी बनियान गँग, त्यांनी त्यांची अब्रू वेशीला टांगलीय; एकनाथ शिंदे का भडकले? पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातील दाजीपूर फोंडा घाट परिसरात तुफान पाऊस

लाडकी बहीण योजना, अजितदादांची आठवण, महाराष्ट्राचा विकास; अधिवेशनच्या पूर्वसंध्येला सुनेत्रा पवार काय म्हणाल्या?

मुख्यमंत्री बदलणार? आमदार एकवटले म्हणाले आम्हाला बदल पाहिजे; 26 फेब्रुवारीला हायकमांड दिल्लीत निर्णय देणार

SCROLL FOR NEXT