Kota Udaipur Highway Accident Death Saam tv News
देश विदेश

Accident Death : महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर; एकाच कुटुंबातील ९ जणांचा अपघाती मृत्यू, देवदर्शन करून परतताना काळाचा घाला

Kota Udaipur Highway Accident Death : राजस्थानच्या कोटा-उदयपूर महामार्गावर भीषण अपघातात महाराष्ट्रातील एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू झाला, तर ६ जण गंभीर जखमी झाले. खाटू श्यामजीचे दर्शन घेऊन परतताना क्रूझर गाडी ट्रकला धडकली.

Namdeo Kumbhar

Maharashtra Family Accident News : राजस्थानमधील कोटा-उदयपूर राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्री झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात लहान मुलांसह एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्वजण खाटू श्यामजीचे दर्शन घेऊन महाराष्ट्राकडे परतत होते. नाता पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शंभूपुरा गावाजवळ ही दुर्दैवी घटना घडली. मृत्यू झालेले सर्व महाराष्ट्रातील एकाच कुटुंबातील होते अशी माहिती समोर आली आहे. (Khatu Shyam Accident News)

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, १६ प्रवाशांना घेऊन जाणारी एक क्रूझर गाडी महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या एका ट्रकला जाऊन जोरात आदळली. ही धडक इतकी जोरदार होती की ९ जणांचा जागीच मृत्यू झाला. जखमी झालेल्या ६ जणांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर महामार्गावर एकच गोंधळ उडाला होता. स्थानिकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आले. रविवारी रात्री सुमारे १ वाजता कोटा-उदयपूर महामार्गावर शंभूपुरा गावाजवळ हा अपघात झाला

कोटाचे अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश जोशी यांनी या घटनेला दुजोरा दिला. त्यांनी सांगितले की, शंभूपुरा परिसरात मध्यरात्री हा अपघात झाला. मृत आणि जखमी सर्वजण एकाच कुटुंबातील आहेत. सर्वजण खाटू श्यामजीचं दर्शन घेतल्यानंतर महाराष्ट्राकडे निघाले होते. जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत. मृतदेह पोस्टमार्टमसाठी सरकारी रूग्णालयात पाठवण्यात आले आहेत. मृतांमध्ये उषा बाई, सुशीला, कैलाश, सान्वी, सज्जन, अनिता, जान्हवी, बाबूलाल आणि माधवी यांचा समावेश आहे.

अपघातातून बचावलेल्या एका मुलाने एएनआयशी बोलताना सांगितले की, आम्ही खाटू श्यामजीवरून धारच्या दिशेने जात होतो. प्रवासादरम्यान आमच्या दोन गाड्या मागे राहिल्या आणि तीन गाड्या पुढे निघून गेल्या. त्यानंतर एका महिलेचा फोन आला की अपघात झाला आहे आणि आम्ही घटनास्थळी पोहोचलो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ramrao Vadkute Passes Away: भाजप खासदार रामराव वडकुतेंचं मध्यरात्री निधन, महाराष्ट्रावर शोककळा

Sunday Horoscope : बोलताना शब्द जपून वापरा! 5 राशींच्या व्यक्तींची पैशाची तंगी कमी होणार; वाचा आजचे राशीभविष्य

Agricultural Land: जमीन खरेदी करून पडीक ठेवणाऱ्यांनो सावधान! सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

प्रसिद्ध क्रिकेटपटूची राजकारणात एण्ट्री; हाती घेतलं कमळ,भाजपमध्ये सामील होताच मिळाली मोठी जबाबदारी

Pune News : पुण्यात भाजपला धक्का! बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश, राजकारणात मोठी घडामोड

SCROLL FOR NEXT