Rajasthan Saam Tv
देश विदेश

राजस्थान: एका समुदायाच्या दोन लोकांवर झालेल्या हल्ल्यानंतर तणाव, इंटरनेट बंद!

परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात

वृत्तसंस्था

राजस्थान: राजस्थानमधील भिलवाडा येथे एका समाजातील दोन व्यक्तींवर झालेल्या हल्ल्यानंतर तणावाचे वातावरण आहे. यानंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी आशिष मोदी यांनी सांगितले की, राजस्थानमधील भीलवाडा शहरात इंटरनेट सेवा २४ तासांसाठी बंद करण्यात आली आहे.

ते म्हणाले की, आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेजही तपासण्याचे काम सुरु आहे. एकाला किरकोळ दुखापत झाली आहे, तर दुसऱ्याच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली असून त्याची प्रकृती स्थिर आहे. मी लोकांना आवाहन करतो की त्यांनी अफवांकडे लक्ष देऊ नये आणि परिसरात शांतता राखावी.

मिळालेल्या माहितीनुसार, एका समाजातील दोन तरुणांवर हल्ला केल्यानंतर त्यांच्या दुचाकी जाळण्यात आल्या आहेत. संतप्त झालेल्या परिसरातून आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी आंदोलन केले जात आहे. तर, दोन्ही जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. संपूर्ण परिसरात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

पोलिस अधीक्षक आदर्श सिद्धू यांनी सांगितले की, सुभाषनगर पोलिस ठाण्यातील सांगानेर शहरात एक घटना घडली आहे, ज्यामध्ये काही लोकांकडून दोघांना मारहाण करण्यात आली आहे. मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे आरोपींची ओळख पटवली जात आहे. आरोपींना लवकरात लवकर पकडण्यात येईल.

हे देखील पाहा-

दरम्यान, राजस्थानमधील जोधपूर शहरात कर्फ्यू आणखी 2 दिवसांसाठी वाढवण्यात आला आहे. आता कर्फ्यू 6 मे रोजी मध्यरात्री 12 पर्यंत लागू राहणार आहे. याबाबतचा आदेश प्रशासनाने जारी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भेंडीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर बनवा कुरकुरीत 'भेंडीची भजी'

Commonwealth Games 2026 : भारताच्या लेकींचा गोल्डन पंच; बॉक्सिंगमध्ये प्रीती पवार, जॅस्मिननं जिंकली सुवर्णपदके

Inflation Alert: सणासुदीपूर्वी सर्वसामान्यांना झटका! डिटर्जंटपासून पेंटपर्यंत 'या' वस्तू होणार महाग

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात अंतर्गत वाद; बड्या नेत्याच्या आमदारकीच्या राजीनाम्याची मागणी, पक्षात काय घडतयं?

पावसाळ्यात तुम्ही कधी कुरकुरीत 'कंटोळी फ्राय' खाल्ली आहे का? एकदा नक्की ट्राय करा ही सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT