rajasthan crime news Two sisters pregnant after physical abuse by youth shocking story from alwar  Saam TV
देश विदेश

Shocking News: पोट दुखतंय म्हणून दोन्ही मुलींना रुग्णालयात नेलं; डॉक्टरांकडे तपासताच आईच्या पायाखालची जमीनच सरकली

Rajasthan Crime News: सतत पोट दुखतं म्हणून आईने दोन्ही मुलींना रुग्णालयात उपचारासाठी नेले. तिथे डॉक्टरांनी त्यांची तपासणी करताच चक्रावून टाकणारा रिपोर्ट समोर आला.

Satish Daud

Rajasthan Crime News: गेल्या काही दिवसांपासून देशभरात महिला अत्याचारांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. अत्याचाराला बळी पडणाऱ्यांमध्ये अल्पवयीन मुलींचं प्रमाण सर्वाधिक आहे. प्रेमाचा बहाणा करून अल्पवयीन मुलींचं शोषण झाल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातून समोर आली आहे.

अलवर गावात राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुली सातत्याने आईकडे पोटदुखीची तक्रार करत होत्या. त्यामुळे आईने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी नेले. तिथे डॉक्टरांनी त्यांची तपासणी करताच चक्रावून टाकणारा रिपोर्ट समोर आला. दोन्ही बहिणी गरोदर असल्याचं डॉक्टरांनी महिलेला सांगितलं.

दोन्ही मुली गरोदर असल्याचं कळताच आईच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने तातडीने दोघींना घेऊन पोलिसांत धाव घेतली. दरम्यान, अल्पवयीन मुलींच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात पोस्को कायद्यान्वे गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे आई-वडील वीटभट्टीवर काम करतात. पीडित मुलींचे वय अनुक्रमे 15 आणि 13 वर्ष आहे. एकेदिवशी अचानक तक्रारदार महिलेच्या मोठ्या मुलीच्या पोटात दुखू लागले. तिने आईकडे या गोष्टीची तक्रार केली.

मात्र, जेवणात तारतम्य न बाळगल्याने पोटदुखीचा त्रास सुरू झाला असावा, असं तक्रारदार महिलेला वाटलं. दोन ते तीन दिवसानंतर लहान मुलीच्याही पोटात दुखू लागल्याने महिलेने दोघींना घेऊन रुग्णालयात धाव घेतली. तिथे डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असता, चक्रावून टाकणारी माहिती समोर आली.

दोन्ही मुली गरोदर असल्याचं डॉक्टरांनी महिलेला सांगितलं. यातील 15 वर्षाची मोठी मुलगी सात महिन्यांची तर, 13 वर्षाची मुलगी अडीच महिन्यांची गर्भवती असल्याची धक्कादायक माहिती डॉक्टरांनी दिली. या माहितीनंतर पीडित मुलींच्या आईला मोठा धक्का बसला.

दरम्यान, महिलेने दोन्ही मुलींना विश्वासात घेऊन घटनाक्रमाबाबत विचारणा केली असता, यावेळी अल्पवयीन बहिणींनी धक्कादायक माहिती दिली. गावातील दोन तरुण दररोज त्यांच्यासोबत वाईट कृत्य करतात असं दोघींनीही सांगितलं. या घटनेनंतर महिलेने पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT