Rajastan Crime
Rajastan Crime Saam TV
देश विदेश

धक्कादायक! पगार कमी असल्याने पत्नीला राग अनावर; दारूच्या नशेत पतीसोबत केलं भयावह कृत्य

साम टिव्ही ब्युरो

बाडमेर : पगार कमी असल्यामुळे कौटुंबिक खर्च भागत नव्हता. त्यामुळे पती-पत्नीमध्ये अनेकदा पैशांवरून वाद होत होते. बुधवारी पुन्हा पती-पत्नीमध्ये जोरदार भांडण झालं. वाद इतका विकोपाला गेला की, पत्नीने चक्क बेल्टने गळा आवळून पतीची हत्या केली. अंगावर काटा आणणारी ही घटना राजस्थानमधील बाडमेर जिल्ह्यात घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली. (Wife Kills Her Husband Crime News)

अनिल कुमार (वय 32) असं मृत्युमुखी पडलेल्या पतीचं नाव आहे. तर मंजूश्री (वय 28) असं संशयित आरोपी पत्नीचे नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे ज्यावेळी पत्नीने हे कृत्य केलं तेव्हा तिने मद्यप्राशन केलं होतं. प्राप्त माहितीनुसार, बाडमेर जिल्ह्यातील कोतवाली गावात राहणाऱ्या अनिल कुमार नामक युवकाचा मंजूश्री हिच्यासोबत 2018 साली विवाह झाला होता. अनिल कुमार हा एका खासगी कंपनीत कामाला होता.

अनिल कुमारच्या आईने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, अनिलच्या पत्नी मंजूश्री हिला महागडे वस्तू खरेदी करण्याची आवड होती. त्याचबरोबर तिला दारू आणि सिगारेटचं व्यसनही होतं. दरम्यान, पतीचा पगार कौटुंबिक खर्चात कमी पडत असल्याने मंजूश्री आणि अनिल कुमार यांच्यात नेहमी वाद व्हायचे. (Husband And Wife Crime News)

बुधवारी मंजूश्रीने पती अनिलला घरी येताना मद्याची बॉटल आणण्यास सांगितलं. पत्नीचा हट्ट पुरवण्यासाठी अनिल कुमारने मद्याची बॉटल आणली. रात्री दोघांनीही मद्यप्राशन केलं. दरम्यान, दोघांमध्येही पैशांवरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, मंजूश्रीने दारूच्या नशेत बेल्टने पती अनिल कुमारचा गळा आवळला.

पती-पत्नीमध्ये सुरू असलेला वाद सोडवण्यासाठी दुसऱ्या खोलीत झोपलेली अनिलच्या आईने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मंजूश्रीने बेल्टने अनिलचा गळा इतका घट्ट आवळला होता की, या घटनेत अनिल कुमारचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, अनिलच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पत्नी मंजूश्री हिला अटक केली आहे. पोलिस चौकशीत तिने आपला गुन्हाही मान्य केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: पुण्यातील लार्गो पिझ्झा हॉटेल आग

Astro Tips: संध्याकाळी या वेळी लावा दिवा, लक्ष्मी येईल घरात

Mumbai News : ठाकरे गटाला भाजप उमेदवाराच्या कार्यलयाबाहेरील राडा भोवला, मुलुंडमधील 5 शिवसैनिकांना अटक

Krishi Seva Kendra: तीन कृषी सेवा केंद्राचे परवाने रद्द, नगरमध्ये खळबळ

Hingoli News: वय उलटूनही लग्न जमेना, नैराश्यातून तरुणाने संपवलं जीवन; हिंगोलीतील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT