Crime News Saam Tv
देश विदेश

Crime : घर दाखवण्याच्या बहाण्याने झुडपात नेलं अन् ७ वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार; शेजाऱ्याचं भयंकर कृत्य

Crime News Update : घर दाखवण्याच्या बहाण्याने ७ वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना राजस्थानमध्ये घडली आहे. या प्रकरणी नराधम शेजाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे.

Namdeo Kumbhar

घर दाखवण्याच्या बहाण्याने एका नराधमाने ७ वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. धक्कादायक म्हणजे आरोपी हा पीडित मुलीचा शेजारीच राहणारा आहे. राजस्थानमधील बाडमेर जिल्ह्यात ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून पुढील तपास केला जात आहे.

घटनेच्या दिवशी आरोपीने मुलीला फुस लावून आपल्या घरी बोलावले आणि तिथे तिच्यावर अत्याचार केला. मुलगी गंभीर अवस्थेत घरी पोहोचल्यानंतर तिने घडलेला सर्व प्रकार पालकांना सांगितला. पालकांनी क्षणाचाही विलंब न करता तात्काळ पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून त्वरित कारवाई करत नराधम शेजाऱ्याला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड संतापाची लाट उसळली असून आरोपीला कडक शिक्षा करण्याची मागणी केली जात आहे.

रविवारी संध्याकाळी बाडनेरमध्ये ही संतापजनक घटना घडली. आरोपी शेजाऱ्याने मुलीला घर दाखवण्याच्या बहाण्याने फसवून एका निर्जन ठिकाणी नेले आणि झुडुपांमध्ये बलात्कार केल्याचं आरोपात म्हटलेय. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाडमेर शहरात रविवारी संध्याकाळी एका ७ वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली. तात्काळ कारवाई करत पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

अल्पवयीन मुलगी तिच्या घरासमोर खेळत असताना आरोपीने एका अनोळखी व्यक्तीचे नाव घेतले आणि त्याला त्याचे घर दाखवण्यास सांगितले. तो तिला आपल्यासोबत घेऊन गेला. त्यानंतर त्याने तिला एका निर्जन ठिकाणी फसवून नेले आणि तिथे तिच्यावर बलात्कार केला. वेदनेने विव्हळत मुलगी घरी पोहोचली आणि तिने आपल्या कुटुंबीयांना घडलेला प्रकार सांगितला.

कुटुंबाने तात्काळ मुलीला रुग्णालयात नेले. माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी कुटुंबाचा जबाब नोंदवला. संपूर्ण तपशील गोळा करण्यासाठी एका पथकाने घटनास्थळाची पाहणी केली आणि मुलीच्या घरीही भेट दिली. पोलिसांनी संशयित आरोपी माघ सिंग याला ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर कुटुंबीय आणि स्थानिकांमध्ये संताप उसळला. पोलिसांनी मुलीची वैद्यकीय तपासणी करून घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का; प्रदेशाध्यक्षांच्या जिल्ह्यातील माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश?

Ram Temple: राममंदिर चोरीविरोधात साधू-संत रस्त्यावर; पंतप्रधान निवासस्थानाकडे साधू करणार आंदोलन

खड्डयांमुळे 20 कंपन्या चाकण सोडणार? खड्डे आणि वाहतूक कोंडीने उत्पादनावर परीणाम, 4 हजार कामगारांच्या रोजगारावर संकट

अमित शाह पवारांच्या घरी; रेवती सुळेंच्या रिसेप्शन सोहळ्याला लावली उपस्थिती, पाहा व्हिडिओ

Maharashtra News Live Update: शिराळा तालुक्यातील आटूगडेवाडीत स्कूल व्हॅनचा भीषण अपघात; अपघातात एक चिमुकली ठार

SCROLL FOR NEXT