Danish Abrar Car Attacked:  Saam tv
देश विदेश

Danish Abrar Car Attacked: काँग्रेस आमदारावर प्राणघातक हल्ला; अज्ञातांनी गाडी फोडली, फेसबुकला लाईव्ह येऊन दिली माहिती

Danish Abrar Car Attacked: राजस्थानचे काँग्रेस आमदार दानिस अबरार यांच्यावर अज्ञातांनी प्राणघातक हल्ला केला आहे.

Vishal Gangurde

Rajasthan Assembly Elections 2023:

राजस्थानचे काँग्रेस आमदार दानिस अबरार यांच्यावर अज्ञातांनी प्राणघातक हल्ला केला आहे. अज्ञातांनी या हल्ल्यात त्यांच्या कारचे मोठे नुकसान करण्यात आले आहे. राजस्थानच्या मलारना चौड सवाईमाधोपूरमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेनंतर दानिस अबरार यांनी फेसबुकवर लाईव्ह येऊन माहिती दिली आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

काँग्रेस आमदार दानिस अबरार यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. फेसबुकला लाईव्ह येत त्यांनी म्हटलं की, मला काँग्रेसकडून तिकीट मिळालं आहे. मी माझ्या कुटुंबासोबत कारने प्रवास करत होतो. त्याचवेळी अज्ञातांनी माझ्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. तरीही मी विधानसभेला निवडणूक लढवेन आणि जिकेंन'.   ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काँग्रेस आमदाराने म्हटलं आहे की, 'मी निवडणूक आयोग आणि जिल्हा प्रशासनाला कारवाई करण्याची विनंती करत आहे की, या निवडणुकीत कोणत्याही उमेदवारांवर असे हल्ले व्हायला नकोत. माझी प्रशासनाला विनंती आहे की, त्यांनी गुंडावर कारवाई करावी. गेल्या दहा वर्षात झालं नाही, ते आज झालं आहे. माझी संपूर्ण कार फोडली आहे. माझ्या लोकांना मारहाण करण्यात आली आहे'.

राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या काँग्रेसच्या पहिल्या यादीत सवाई माधोपूरमधून दानिश अबरार यांना पुन्हा एकदा तिकीट देण्यात आलं आहे. दानिश अबरार यांची लढत भाजपचे राज्यसभा खासदार किरोडलाल मीणा यांच्याशी होणार आहे. गेल्या राजस्थान विधानसभा निवडणुकीत भाजपने किरोडीलाल यांना तिकीट दिलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: ओळखपत्र,मोबाईल हिसकावला नंतर खांबाला बांधलं; ड्युटीवर निघालेल्या लष्कर जवानासोबत टोल कर्मचाऱ्यांचं संतापजनक कृत्य

Pregnancy Tips : गर्भावस्थेतील मधुमेह नियंत्रणात ठेवणे का आवश्यक आहे?

Pandharpur: डॉल्बीच्या आवाजामुळे एकाचा मृत्यू, दंहीहंडीचा कार्यक्रम पाहायला आला अन्...; पंढरपुरात खळबळ

Hair Loss Remedie : टक्कल पडण्याची समस्या? हे घरगुती उपाय करतील मदत

Rahul Gandhi: व्होट चोरीवरून टोकदार प्रश्न, निवडणूक आयोगानं दिली उत्तरं; तुम्ही समाधानी आहेत का?

SCROLL FOR NEXT