AJMER CAR FIRE TRAGEDY: FOUR FAMILY MEMBERS BURNT ALIVE IN RAJASTHAN Saam Tv
देश विदेश

Accident News : भीषण दुर्घटना! धावत्या कारने घेतला पेट; माजी सरपंचासह कुटुंबातील ४ सदस्यांचा होरपळून मृत्यू

Rajstha Car Accident News : राजस्थानमध्ये धावत्या कारला अचानक आग लागून माजी सरपंच रामसिंह चौधरी यांच्यासह एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Alisha Khedekar

  • अजमेर जिल्ह्यात धावत्या कारला अचानक आग लागून चौघांचा मृत्यू

  • मृतांमध्ये माजी सरपंचासह कुटुंबाचा समावेश

  • शॉर्ट सर्किट किंवा तांत्रिक बिघाडामुळे दुर्घटना घडल्याचा अंदाज

  • फॉरेन्सिक टीमच्या मदतीने पोलिसांकडून सखोल तपास सुरू

Rajsthan Car Accident News राजस्थानातील अजमेर जिल्ह्यात गुरुवारी पहाटे एक हृदयद्रावक दुर्घटना घडली. श्रीरामपुरा गावाजवळ धावत्या कारला अचानक आग लागल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा जिवंत होरपळून मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना बोराडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. माजी सरपंच रामसिंह चौधरी हे त्यांच्या कुटुंबासोबत आई पूसी देवी यांना उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जात होते. पूसी देवी यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला होता. मात्र, रुग्णालय गाठण्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर झडप घातली.

रस्त्यात असताना कारला अचानक आग लागली. आग इतक्या वेगाने पसरली की वाहनातील लोकांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. काही क्षणांत संपूर्ण गाडी आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली आणि आत अडकलेल्या चौघांचा जिवंत होरपळून मृत्यू झाला. या दुर्घटनेत माजी सरपंच रामसिंह चौधरी, त्यांची आई पूसी देवी, पत्नी सुरज्ञान देवी आणि भाची महिमा यांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे सुरज्ञान देवी या जिल्हा परिषद सदस्या होत्या. त्यांच्या निधनामुळे राजकीय व सामाजिक क्षेत्रातही शोक व्यक्त करण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. दुर्घटनेनंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. पोलीस अधीक्षक हर्षवर्धन अगरवाला यांनी प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किट किंवा वाहनातील तांत्रिक बिघाडामुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त केली आहे. नेमकं कारण शोधण्यासाठी फॉरेन्सिक टीमची मदत घेण्यात आली असून सखोल तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मनसेच्या किल्लेदारांनी मुंबईच्या महापौर तावडेंवर फेकली वही, VIDEO

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! भरधाव बसची महिलेला धडक, चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू

Financial Planning : पगार येताच पैसे संपतात? या ५ सवयी बदलू शकतात तुमचं महिन्याचं बजेट

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी

मोठी बातमी! भाजपला मोठा धक्का, तडकाफडकी राजीनामा देत बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT