Rajasthan Hisar Accident News: राजस्थानमध्ये (Rajasthan) ट्रक आणि पिकअपचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अपघातात तीन अल्पवयीन मुलांसह 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघात मृत्यू झालेले कुटूंब हे हरियाणातील हिस्सार जिल्ह्यातील सिहडवा गावातील असून ते शनिवारी सालासर बालाजीच्या दर्शनासाठी आले होते. या दुखद आणि दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Latest Marathi News)
याबाबत अधिक माहिती अशी की, राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातील सादुलपूर पोलीस स्टेशन परिसरात राष्ट्रीय महामार्ग-52 वर ट्रक आणि पिकअप यांच्यामध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास डोकवा रतनपुरा गावादरम्यान हा अपघात झाला. यात सालासर बालाजीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या हरियाणातील (Hariyana) एका कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.
या भीषण अपघातात 6 जण जखमी झाले आहेत. घटनेनंतर जखमींना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तीन गंभीर जखमींना हिस्सार येथे दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये तीन मुले आणि दोन महिलांचा समावेश असून सर्व मृत एकाच कुटुंबातील असल्याचे सांगण्यात येत आहे.
हा अपघात इतका भीषण होता की पिकअपचा चक्काचूर झाला. अपघातानंतर घटनेची माहिती मिळताच सादुलपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. या अपघातातील मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. देव दर्शनासाठी आलेल्या कुटूंबावर काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.( Accident News)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.