Accident News Saam Tv
देश विदेश

Accident News: नोकरीच्या शोधात निघालेल्या मजुरांच्या वाहनाची टँकरला धडक; 8 जणांचा जागीच मृत्यू, 16 जखमी

Rajasthan Accident : राजस्थानमध्ये दोन वाहनांची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला आहे.

Satish Kengar

राजस्थानच्या सिरोहीमध्ये रविवारी रात्री मोठा अपघात झाला. येथे चुकीची बाजूने येणाऱ्या जीप आणि टँकरची समोरासमोर धडक झाली. या अपघातात जीपमधून प्रवास करणाऱ्या 8 जणांचा मृत्यू झाला असून 16 जण जखमी झाले आहेत. हा अपघात उदयपूर-पालनपूर महामार्गावर पिंडवारा पोलीस स्टेशन हद्दीतील कँटर पुलियाजवळ झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, वाहनात प्रवास करणारे सर्व जण उगानासर, उदयपूर येथील रहिवासी होते. ते मजुरीसाठी सिरोहीमार्गे पालीच्या नकोडा मंदिर येथे जात होते.

अपघाताची माहिती मिळताच पिंडवाडा पोलीस ठाण्याचे अधिकारी, पिंडवाडा डीएसपी भंवरलाल चौधरी आणि तहसीलदार घटनास्थळी पोहोचले. या अपघातात जीप वाहनाचा पूर्ण चेंदामेंदा झाला. अपघात झालेल्या वाहनात खूप लोक अडकली होती. बऱ्याच प्रयत्नानंतर जखमींना बाहेर काढण्यात आले. यानंतर सर्व जखमींना पिंडवाडा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. तेथून त्यांना पुढील उपचारासाठी सिरोही जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं.

या अपघाताची माहिती देताना सिरोहीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रभू दयाल म्हणाले की, सिरोहीसाठी पिंडवाड्याला गेल्यास हायवे लागतो. हा रस्ता फक्त दीड किलोमीटरचा आहे. या रस्त्यावरून जीपनेचुकीच्या बाजूने वळण घेतले आणि यादरम्यान समोरून येणाऱ्या टँकरची समोरासमोर धडक झाली. कारमध्ये 29 जण होते. त्यापैकी 8 जणांचा मृत्यू झाला. 16 जण जखमी झाले असून 5 जण सुखरूप आहेत.

याप्रकरणी सिरोहीच्या जिल्हाधिकारी अल्पा चौधरी यांनी सांगितले की, ''अपघातानंतर येथे मोठी वाहतूककोंडी झाली होती. मात्र आता महामार्ग खुला करण्यात आला आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे. दोन गंभीर जखमींना उदयपूर येथे उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे. अपघातामागे कोणती कारणे होती? त्याची तपासणी केली जात आहे. भविष्यात असे अपघात होऊ नयेत यासाठीही प्रयत्न केले जातील.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MHT-CET Exam 2027 : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! MHT CET ची परीक्षा कधी होणार? सीईटी सेलची महत्त्वाची माहिती

Maharashtra News Live Update: २२ किलोमीटरच्या रस्त्यासाठी गडचिरोलीत हजारो आदिवासींचा एल्गार

Carpet Cleaning : घाणेरडे कार्पेट स्वच्छ करण्यासाठी एकही रुपया खर्च नको! घरच्या घरी ड्राय क्लीनिंग करण्याच्या 3 सोप्या स्टेप्स

AC temperature: कोणत्या तापमानावर एसी चालवल्याने विजेचे बिल कमी होतं?

Akshay Kumar : टायगर श्रॉफवरील हल्ल्याचा अक्षय कुमारने घेतला धसका? घराबाहेर वाढवली सुरक्षा

SCROLL FOR NEXT