Raj Babbar News Update
Raj Babbar News Update SAAM TV
देश विदेश

Raj Babbar : राज बब्बरला कोर्टानं सुनावली दोन वर्षांची शिक्षा, २६ वर्षांपूर्वीचं प्रकरण जाणून घ्या

Nandkumar Joshi

लखनऊ: अभिनेते आणि काँग्रेसचे नेते राज बब्बर यांना एमपी एमएलए कोर्टानं दोन वर्षांची शिक्षा सुनावली. तसेच त्यांना कोर्टानं ८५०० रुपयांचा दंडही ठोठावला. तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यानंतर काही वेळातच त्यांना प्रत्येकी २० हजार रुपयांचे दोन जामीन आणि वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन देण्यात आला. (Raj Babbar sentenced to 2 years jail by MP MLA court)

राज बब्बर (Raj Babbar) यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणि मारहाणीच्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं. शिक्षा सुनावली त्यावेळी राज बब्बर कोर्टात हजर होते. २ मे १९९६ रोजी मतदान अधिकाऱ्याने वजीरगंजमध्ये त्यांच्याविरोधात तक्रार नोंदवली होती.

राज बब्बर त्यावेळी समाजवादी पक्षाचे उमेदवार होते. मतदान अधिकाऱ्याला मारहाण केल्याचे ते प्रकरण होते. दरम्यान राज बब्बर एका महिन्याच्या आत जिल्हा न्यायालयात (Court) या शिक्षेविरोधात अपील करू शकतात. एमपी एमएलए कोर्टाने राज बब्बर यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

काय आहे प्रकरण?

१९९६ मध्ये सरकारी कामात अडथळा आणि मारहाण प्रकरणी मतदान अधिकाऱ्याने राज बब्बर यांच्याविरोधात तक्रार नोंदवली होती. मतदान अधिकारी श्रीकृष्ण सिंह राणा यांनी २ मे १९९६ रोजी वजीरगंज पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. राज बब्बर आणि अरविंद यादव यांच्यासह अन्य काही जणांविरोधातही तक्रार केली होती.

राज बब्बर हे काही समर्थकांसमवेत त्यावेळी मतदान केंद्रात घुसले आणि मतदान प्रक्रियेत बाधा आणली. सरकारी कामात अडथळा आणण्याबरोबरच तेथील अधिकारी, कर्मचाऱ्यांसोबत गैरवर्तन केले. तसेच मारहाण केली, असा आरोप तक्रारीत करण्यात आला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी अपडेट; वाहनाची टाकी फुल करण्याआधी वाचा आजचे दर

Special Report : Amol Kolhe | हडपसर ठरवणार शिरूरचा खासदार? संसदेत कोल्हे जाणार की आढळराव?

Special Report : राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी एकाच मंचावर

Shirur Loksabha: धक्कादायक! सातारा, बारामतीनंतर शिरुरमध्ये ईव्हीएम गोदामातील CCTV बंद; २४ तासांनंतर पुन्हा सुरू

West Bengal: पश्चिम बंगालमध्ये वीज पडून १२ जणांचा दुर्दैवी मृत्यू; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

SCROLL FOR NEXT