Rain Alert Saam Tv
देश विदेश

Rain Alert: आजही तुफान पाऊस, १४ राज्यांना इशारा; ५०-६० च्या वेगाने वारे वाहणार, महाराष्ट्रात काय स्थिती?

Weather Update: देशातील अनेक राज्यात कुठे थंडीची चाहूल लागली आहे तर काही ठिकाणी पाऊसचा धुमाकूळ सुरू आहे. आज हवामान खात्याने १४ राज्यांना पावसाचा इशारा दिला आहे.

Priya More

पावसाळा संपला तरी देखील देशात पावसाचा कहर सुरूच आहे. ऐन दिवाळीत अनेक राज्यांना पाऊस झोडपून काढत आहे. आज देशातील सुमारे १४ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पाऊस, ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण भारतात तामिळनाडू आणि पुदुचेरीमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या ठिकाणी वारे ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वाहू शकतात आणि वाऱ्याच्या झोतांचा वेग ताशी ६० किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो.

हवामान खात्याने देशातील १४ राज्यातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. जम्मू आणि काश्मीर, लडाख, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय आणि ईशान्येकडील इतर राज्यांमध्येही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. अंदमान आणि निकोबारमध्येही पाऊस पडण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी बर्फवृष्टीचाही अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ठाण्यातील खारेगाव परिसरात गोडाऊनला भीषण आग

Wednesday Horoscope : बुधवारी लक्ष्मीची विशेष कृपा! 'या' राशींना मिळणार धनलाभाची संधी; आजचे राशीभविष्य वाचाच

'आणीबाणी लादणं ही इंदिरा गांधींची मोठी चूक'; सोनिया गांधींच्या आत्मचरित्रात धक्कादायक खुलासे

Gokul Chairman Election: अखेर गोकुळवर महायुतीची सत्ता; राजेश पाटील गोकुळचे नवे अध्यक्ष

आयफोनच्या हौसेपायी सासूच्या दागिन्यांवर डल्ला; सुनेविरोधात घेतली पोलिसांत धाव

SCROLL FOR NEXT