Rahul Navin New ED Director Saam Tv
देश विदेश

Rahul Navin New ED Director: राहुल नवीन ED चे कार्यकारी संचालक, जाणून घ्या कशी आहे त्यांची कारकीर्द

ED Director News: राहुल नवीन ED चे कार्यकारी संचालक, जाणून घ्या कशी आहे त्यांची कारकीर्द

Satish Kengar

Rahul Navin New ED Director:

भारतीय महसूल सेवा (IRS) अधिकारी 1993 च्या बॅचचे राहुल नवीन यांची ईडीचे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ईडीचे विद्यमान संचालक संजय मिश्रा यांचा कार्यकाळ 15 सप्टेंबर रोजी संपत आहे.

त्यांनी सुमारे चार वर्षे 10 महिने ईडीचे संचालक म्हणून काम केले. त्यांचा कार्यकाळ वाढवण्यासाठी सीव्हीसी कायद्यातही सुधारणा करण्यात आली.

संजय कुमार मिश्रा यांनी 2018 मध्ये ईडी संचालकपदाची सूत्रे हाती घेतली होती. त्यानंतर त्यांना मुदतवाढ देण्यात आली. संजय मिश्रा हे 1984 च्या बॅचचे आयआरएस अधिकारी असून त्यांचा कार्यकाळ 18 नोव्हेंबर 2023 पर्यंत निश्चित करण्यात आला होता. (Latest Marathi News)

त्यांच्या तिसऱ्या सेवा मुदतवाढीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. 11 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले होते आणि बेकायदेशीर ठरवले होते आणि 31 जुलैपर्यंत पद सोडण्याचे निर्देश दिले होते, मात्र केंद्राने मुदतवाढ देऊन त्यांचा कार्यकाळ वाढवला होता. सर्वोच्च न्यायालयाने 15 सप्टेंबर रोजी त्यांचा कार्यकाळ संपुष्टात आणण्याचे आदेश दिले होते.

कोण आहे राहुल नवीन?

राहुल नवीन हे मूळचे बिहार येथील आहेत. ते त्यांच्या कार्यक्षम आणि शांत वर्तनासाठी ओळखले जातात. ये स्वत: फार कमी बोलतात, असे तपास यंत्रणेत त्याच्याबद्दल बोलले जाते. पण त्यांची पेन अधिक बोलते, असं त्यांच्याबद्दल बोललं जातं. ते अतिशय संघटित आहेत आणि कायदेशीर पद्धतीने काम करतात. ते अत्यंत कुशाग्र अधिकारी मानले जातात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Krishi Thapanda: धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरी आढळला ३३ वर्षीय मित्राचा मृतदेह; पोलिसांकडून तपास सुरू

Ambernath : अंबरनाथमध्ये तरुणावर हल्ला, पुतणीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून काकाने काढला राग; ५ आरोपींवर गुन्हा

Ketan Agarwal Case: केतन अग्रवालच्या हत्येआधीचा धक्कादायक व्हिडीओ आला समोर, सिया अन् चेतन होते सोबत

संजय दिना पाटील यांची पत्रकारांना शिवीगाळ; मुख्यमंत्री काय म्हणाले? VIDEO

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यात पावसाचे आगमन

SCROLL FOR NEXT