rahul Gandhi Saam Tv
देश विदेश

Rahul Gandhi Tweet: खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले?

Rahul Gandhi First Reaction MP disqualification: मी भारताच्या आवाजासाठी लढत राहील.

साम टिव्ही ब्युरो

Political News :  राहुल गांधी यांची खासदारकी सुरत न्यायालयाच्या निकालानंतर रद्द करण्यात आली आहे. राहुल गांधी या कारवाईमुळे काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये असंतोष आहे. राहुल गांधी यांनी कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

राहुल गांधी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, मी भारताच्या आवाजासाठी लढत राहील. मी यासाठी काहीही करायला तयार आहे. राहुल गांधीच्या ट्वीटवर यूजर्स समिश्र प्रतिक्रिया देत आहे.

कालच राहुल गांधी यांना सुरत कोर्टाने मानहानीच्या प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. राहुल गांधी यांनी 'मोदी' आडनावावरून वादग्रस्त वक्तव्य केले होते.

13 एप्रिल 2019 रोजी कर्नाटकातील कोलार येथे एका निवडणूक सभेत राहुल गांधींनी नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी हे आडनाव सामान्य का आहे? सगळ्या चोरांची आडनावं मोदी का? असं वक्तव्य केलं होतं. याच प्रकरणावरुन राहुल गांधी यांच्यावर गेल्या चार वर्षांपासून मानहानीचा खटला सुरू होता.

चोराला चोर म्हणणे हा आपल्या देशात गुन्हा- उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे म्हणाले, 'राहुल गांधी यांची खासदारकी अखेर रद्द करण्यात आली. चोराला चोर म्हणणे हा आपल्या देशात गुन्हा ठरला आहे. चोर आणि देश लुटणारे आजही मोकळे आहेत आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना शिक्षा ठोठावली गेली'.

'लोकशाही चे हे सरळ हत्याकांड आहे. सर्व सरकारी यंत्रणा दबावाखाली आहेत. हुकूमशाहिच्या अंताची ही सुरुवात आहे. फक्त लढाईला दिशा द्यावी लागेल, असेही उद्धव ठाकरे पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ओला दुष्काळ जाहीर करा, अन्यथा नेपाळसारखी अवस्था करू; शेतकरी आक्रमक, सरकारला थेट इशारा

Nanded : फिरायला गेले अन् घात झाला, फोटो काढण्याच्या नादात...; पालकांचा मन हेलावणारा आक्रोश

Maharashtra Live News Update: जमीनमोजणीशिवाय दस्त नोंदणी नाही - चंद्रशेखर बावनकुळे

Asia Cup 2025: आज ओमानविरूद्ध मैदानात उतरणार सूर्या ब्रिगेड; बेंचवरील खेळाडूंना मिळणार संधी?

Ola Uber Fare Hike: ओला- उबरचा प्रवास महागला! भाड्यात मोठी वाढ, प्रवाशांच्या खिशाला फटका

SCROLL FOR NEXT