Rahul Gandhi Priyanka Gandhi FIR Akashvani Bhawan  
देश विदेश

मोठी बातमी! राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यावर गुन्हा दाखल; 'त्या' घटनेनंतर पोलीस ॲक्शन मोडमध्ये

Rahul Gandhi latest news : आकाशवाणीच्या तक्रारीनंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात FIR दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.

Namdeo Kumbhar

Rahul Gandhi Priyanka Gandhi FIR Akashvani Bhawan : काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आकाशवाणी भवनाच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी-प्रियांका गांधी यांच्यासह इतर विरोधी नेत्यांवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. ६ ऑक्टोबर रोजी 'इंडिया' (INDIA) आघाडीच्या निवडणूक आयोग मार्चदरम्यान आकाशवाणी भवन परिसरात विनापरवाना प्रवेश केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

मंगळवारी निवडणूक आयोगावर राहुल गांधींच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. या मोर्चा काढणाऱ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांना पोलिसांनी वाटेतच रोखले होते. यानंतर राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि काही प्रमुख नेते अचानक आकाशवाणी भवनाच्या आवारात शिरले आणि तिथेच धरण्यावर बसले. तब्बल ९ तास चाललेल्या या ठिय्या आंदोलनानंतर दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह अनेक नेत्यांना ताब्यात घेतले होते. आता या प्रकरणी पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.

निवडणूक आयोगाविरोधात विरोधक आक्रमक: मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात विरोधकांचे आंदोलन आजही सुरूच राहणार आहे. मतदार यादीतील 'एसआयआर' (SIR) प्रकरणावरून निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित करत विरोधी पक्षांनी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. मंगळवारी झालेल्या मोर्च्यानंतर, आज आप काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयावर पुन्हा निदर्शने करण्याची घोषणा केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: - नाशिकच्या पेठ तालुक्यातील सावळघाटात रात्री भीषण अपघात

CNG Price : पुण्यात महागाईचा भडका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, आता १ किलोसाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये

Gautami Patil : 'केवड्याचं पान तू...'; नऊवारीचा थाट अन् नथीचा नखरा, गौतमीचा मराठमोळा अंदाज | लेटेस्ट PHOTOS

Breaking News : निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा २ दिवसीय दौरा अचानक रद्द; कारण आलं समोर

High blood pressure: औषधांशिवाय BP नियंत्रणात आणायचाय? दररोज फक्त 'या' 3 सवयी लावा

SCROLL FOR NEXT