Rahul Gandhi Defamation Case Saam TV
देश विदेश

Rahul Gandhi Case Update: मोदी आडनावाचा अवमान; राहुल गांधींना शिक्षा होणार की टळणार? कोर्टाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष

Rahul Gandhi Defamation Case: मोदी आडनावाविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी राहुल गांधी यांना सुरत येथील कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती.

साम टिव्ही ब्युरो

Rahul Gandhi Defamation Case: काँग्रेससाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. कारण, राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती मिळणार की नाही? याबाबत आज गुजरात उच्च न्यायालय निकाल देणार आहे. मोदी आडनावाविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी राहुल गांधी यांना सुरत येथील कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती.

त्यानंतर राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी सुद्धा रद्द करण्यात आली होती. दरम्यान, या शिक्षेला स्थगिती मिळावी, यासाठी राहुल गांधी यांनी गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आज या याचिकेवर न्यायालय निकाल देणार असून या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे

नेमकं काय आहे प्रकरण?

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या संदर्भात वक्तव्य केले होते. सर्व चोरांची नावे मोदी कशी काय? अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती. याप्रकरणी सुरत पश्चिम येथील भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर मानहानीचा दावा दाखल केला होता.

त्यानंतर सुरत येथील सत्र न्यायालयाकडून राहुल गांधींना दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर दुसऱ्याच दिवशी लोकसभा सचिवालयानेही त्यांचे सदस्यत्व (खासदार पद) रद्द केले होतं. त्यामुळे राहुल गांधी यांना ८ वर्षांपर्यंत निवडणूक लढवता येणार नाहीये.

दरम्यान, या कारवाईनंतर राहुल गांधी यांनी ट्विट करत त्यावर प्रतिक्रिया दिली होती. "मी भारताच्या आवाजासाठी लढत आहे. त्यासाठी मीकोणतीही किंमत चुकवायला तयार आहे." असे ट्विट राहुल गांधी यांनी केले होते.

दरम्यान, राहुल गांधी यांनी सुरत कोर्टाच्या निर्णयाविरोधात गुजरात हायकोर्टात (Gujarat High Court) धाव घेतली होती. त्यानंतर कोर्टाने अंतिम निर्णय येईपर्यंत शिक्षेला स्थिगिती दिली होती. याप्रकरणात गुजरात हायकोर्टात सुनावणी सुरू असून आज कोर्ट यावर निकाल देणार आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Train Accident : मुंबईहून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा अपघात कसा घडला? कारण आलं समोर

Gold and Silver Prices: चांदी चकाकली! चांदीच्या दरात ३,५०० रुपयांची वाढ, सोनंही महागलं

LPG Cylinder Booking Rules: १ मे पासून एलपीजी बुकिंगचे नियम बदलणार, सिलिंडर डिलीव्हरीतही बदल होणार?

पोपट आता पाळीव नाही तर ‘वन्यजीव, 10 वर्षांच्या लढाईनंतर शेतकऱ्याला न्याय

अपात्र लाडकींचा आकडा 26 लाख? बोगस लाभार्थ्यांकडून 165 कोटी वसूल करणार, 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसीची मुदत

SCROLL FOR NEXT