Rahul Gandhi Speech Saam tv
देश विदेश

Rahul Gandhi Speech : PM नरेंद्र मोदींनी १० वर्षांत शेतकऱ्यांसाठी काय केलं? राहुल गांधींचा गोंदियातून घणाघात,VIDEO

Rahul Gandhi on PM Narendra Modi : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. गांधी गोंदियातून मोदींवर तुफान बरसले आहेत.

Vishal Gangurde

गोंदिया : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधींनी महाराष्ट्र पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. राहुल गांधी यांच्यासहित प्रियंका गांधी देखील प्रचारासाठी मैदानात उतरल्या आहेत. राहुल गांधींनी गोंदियातील प्रचारसभेत भाजप सरकार आणि पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली.

राहुल गांधी यांच्या भाषणातील मुद्दे

नरेंद्र मोदींनी तीन काळे कायदे आणले. या कायद्याविरोधात शेतकरी रस्यावर उतरले. त्याच्या उलट नरेंद्र मोदी म्हणत आहेत की, मी शेतकऱ्यांसाठी कायदे आणले. नरेंद्र मोदींनी किती शेतकऱ्यांचे कर्ज माफ केलं आहे का? मोदींनी दहा वर्षांत शेतकऱ्यांसाठी काय केलं?

दुसरीकडे उद्योगपतींचे कर्ज माफ करत आहेत. धारावीची जमीन अदानींच्या घशात घालत आहेत. टीव्ही अंबानी कुटुंबीयांच लग्न दिसलं. पण शेतकऱ्यांचा फोटो दिसला नाही. मोदी लग्नाला गेले होते. मी गेलो नाही. कारण ते त्यांचे आहेत.

भारतात मागासवर्गीय मोठ्या प्रमाणात आहे. पण नेमका किती आहे, याची माहिती कोणाला ठाऊक नाही. भारतात कमीत कमी ५० टक्के ओबीसी आहेत. मात्र, २४ तास नरेंद्र मोदी हे स्वत:ला ओबीसी असल्याचे सांगत असतात. देशात सर्वात जास्त जीएसटी गरीब लोक देतात.

सर्वात जास्त जीएसटी मागासवर्गीय देतात. अदानी हे जीएसटी देत नाहीत. जीएसटीचा पैसा भारतीय सरकारकडे जातो. प्रत्येक वर्षी अर्थमंत्री बजेट सादर करतात. बजेटमध्ये आपल्या धनाचा साठा वाटला जातो. तुम्ही रोज जीएसटी देत आहात.

अर्थमंत्री बजेट सादर करतात, त्यासाठी देशाच्या बजेटसाठी ९० प्रशासकीय अधिकारी निर्णय घेतात. या निर्णय घेणाऱ्या लोकांमध्ये ३ ओबीसी अधिकारी आहेत. ओबीसी अधिकारी फक्त ५ टक्क्यांचा निर्णय घेतात.

त्यात दलित, आदिवासी अधिकारी कमी आहेत. हा खरा अपमान आहे. लोकसभेत काँग्रेस पक्ष काही महत्वाचे काम करणार. पहिलं म्हणजे काँग्रेस जातनिहाय जनगणना करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मोठी बातमी! ठाकरेंचा दिग्गज नेता आणि नगरसेवकाविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: सोयाबीनचे बियाणे विक्री करणाऱ्या 'बूस्टर' कंपनीविरोधात अमरावतीत गुन्हा

SET Exam Update : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! SET परीक्षा पुढे ढकलली, नेमकं कारण काय? कधी होणार परीक्षा? वाचा A to Z अपडेट्स

Sindhudurg Tourism : मालदीव विसरा! महाराष्ट्रातच आहे 'हा' निसर्गरम्य समुद्रकिनारा, पावसाळ्यात दिसतं आरशासारखं निळेशार पाणी

Salman Khan : सलमान खानने विकले मुंबईतील आलिशान घर; किती कोटींमध्ये झाली डील, आकडा पाहून व्हाल चकित

SCROLL FOR NEXT