Rahul Gandhi  Saam Tv
देश विदेश

Rahul Gandhi News : मला वाटत होतं की तो मला मारून टाकेल...; राहुल गांधींनी स्वत: सांगितला काळजात धडकी भरवणारा किस्सा

Rahul Gandhi at Cambridge University: यात्रेतील अंगावर काटा आणणारा एक प्रसंग त्यांनी सांगितला आहे.

Ruchika Jadhav

Bharat Jodo Yatra : जनतेच्या मनातील प्रश्न त्यांची सुख-दु:ख जाणून घेण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भलीमोठी भारत जोडो यात्रा काढली. त्यांनी घेतलेल्या भारत जोडो यात्रेची सर्वच स्थरांतून मोठी चर्चा झाली होती. अशात आता याच यात्रेतील अंगावर काटा आणणारा एक प्रसंग त्यांनी सांगितला आहे. सध्या राहुल गांधी यांचा ब्रिटन दौरा सुरू आहे.(Latest Political News)

ब्रिटन दौऱ्यावर त्यांनी केंब्रिज विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी बोलत असताना एक किस्सा सांगितला आहे. यावेळी राहुल गांधी म्हणाले की, 'आम्ही सर्वजण यात्रेत सहभागी झालो होतो. काश्मीरमध्ये पोहचल्यावर माला एक विचित्र अनुभव आला.' कपाळावर थोड्या आट्या आणत राहुल गांधींनी आपल्यावर दहशतवादी हल्ला होणार होता असा धक्कादायक खुलासा केला आहे.

यामध्ये त्यांनी संपू्र्ण घटना सांगत असताना म्हटलं की, 'जेव्हा मी यात्रेमध्ये चालत होतो तेव्हा अनेक व्यक्ती मला भेटायला येत होत्या. त्यांना भेटून मी त्यांचे प्रश्न जाणून घेत होतो. यावेळी असाच एक वक्ती माझ्या जवळ आला. सुरक्षारक्षकांनी मला एकट्याने त्याला भेटण्यास नकार दिला. मात्र मी स्वत:त्याला जवळ बोलावून घेतलं.'

'पुढे तो आणि मी रस्त्याने चालत होतो. त्यावेळी त्याने मला विचारलं की, तुम्ही खरोखर लोकांची सेवा करण्यासाठी आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आले आहात का? मी हो म्हटलं. त्यानंतर तो मला रस्त्याच्या एका कडेला घेऊन गेला आणि दूरवर पहायला सांगितलं. तिथे एक व्यक्ती उभा होता. तो दहशतवादी आहे असं त्या व्यक्तीने मला सांगितलं, असं राहुल गांधी म्हणाले.

'त्या व्यक्तीने माझ्याकडे पाहिल्यावर मी शांतपणे त्याच्याकडे पाहत होतो. मी त्याच्याकडे आणि तो माझ्याकडे पाहत होता. मला वाटलं तो आता मला मारून टाकेल. मात्र त्याने मला कोणतीही इजा पोहचवली नाही. जर त्याला मला मारायचे असते तर तेव्हा उत्तम संधी होती. तो व्यक्ती अगदी सहज मला मारू शकला असता, असंही राहुल गांधी यांनी आपला किस्सा सांगताना म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, दोन नव्या मेट्रो स्थानकाला सरकारने दिली मंजुरी, वाचा सविस्तर

Reducing sweets: जगभरात 250 कोटी लोकं 'या' गंभीर आजाराशी झुंजतायत; आहारातील गोड कमी करणं ठरेल उपाय, WHO चा इशारा

Dance Viral Video : लुक लुक डोळे अन् मोतुले कान; 'बाप्पा येणार येणार' गाण्यावर चिमुकल्यांचा जबरदस्त डान्स

बीडमध्ये घरगुती वाद टोकाला; भररस्त्यावर तरूणाच्या डोक्यात कोयता हाणला, मेंदूचा चेंदामेंदा झाला

War 2 VS Coolie : रजनीकांत यांच्या 'कुली'ची पहिल्या आठवड्यात छप्परफाड कमाई, 'वॉर 2' लवकरच गाठणार 200 कोटींचा टप्पा

SCROLL FOR NEXT