Rahul Gandhi leads a fierce protest outside the Prime Minister’s residence in Delhi over the NEET paper leak, as Congress leaders clash with police before being detained. saam tv
देश विदेश

हातात बेड्या अन् प्रचंड राग...पंतप्रधानांच्या घराबाहेर राहुल गांधींनी केलेल्या आंदोलनाची दृश्ये, पाहा PHOTO

Rahul Gandhi Protest Outside PM Residence Over NEET Leak: नीट पेपरफुटी आणि दिल्लीतील लाठीचार्जच्या निषेधार्थ राहुल गांधी यांनी पंतप्रधान निवासस्थानाबाहेर आक्रमक आंदोलन केलं. प्रियंका गांधींसह काँग्रेस नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. या आंदोलनातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Omkar Sonawane
rahul gandhi

NEET पेपरफुटी आणि दिल्ली पोलिसांनी तरूणांवर केलेल्या अमानुष लाठीचार्ज प्रकरणी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली असून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे खासदार आंदोलणासाठी रवाना झाले.

Rahul Gandhi’s Fiery Protest Outside PM Residence Goes Viral Amid NEET Row

पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करताना राहुल गांधी वेगळ्याच अंदाजात दिसले. कंबरेवर हात ठेवून त्यांनी सरकारविरोधात ठाम भूमिका घेतली. एकीकडे सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी जंतर मंतरवर आंदोलन तीव्र केल्यानंतर आता त्याला काँग्रेसने देखील मोठा पाठिंबा देत राहुल-प्रियंका गांधी यांच्यासह इंडिया आघाडीचे प्रमुख नेते दाखल झाले.

Rahul Gandhi Seen in Aggressive Avatar During Protest Outside PM Modi’s Residence

आंदोलनादरम्यान राहुल गांधी यांनी उपस्थितांना संबोधित करत विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याची इच्छा असलेल्या सर्वांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.

NEET Paper Leak Protest Escalates Rahul Gandhi, Priyanka Lead Opposition Showdown in Delhi

आंदोलन सुरू झाल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी घटनास्थळी येऊन राहुल गांधींना आंदोलन थांबवण्याची विनंती केली, त्यांच्यासोबत गृहसचिव गोविंद मोहनही उपस्थित होते. यावेळी राहुल गांधी यांनी जितेंद्र सिंह यांच्याकडे 5 प्रमुख मागण्या ठेवल्या.

Rahul Gandhi protest

यावेळी राहुल गांधी यांनी स्वतः सर्वांना प्लास्टिक नॉट वाटत प्रतीकात्मक बेड्या घालून आंदोलन केले. यावेळी त्यांनी शिक्षण मंत्र्यासोबत आता पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनीही राजीनामा द्यावा अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.

Delhi police clash with Congress leaders protest

आंदोलनाची तीव्रता पाहता दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी यांच्यासह सर्व नेत्यांना मोठा घेराव घातला. यावेळी पोलीस आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये झटापट देखील पाहायला मिळाली. अखेर पोलिसांनी राहुल गांधी यांच्यासह सर्व नेत्यांना ताब्यात घेत पोलीस व्हॅनमध्ये टाकले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: पावसाळ्यात फ्रिझी केसांपासून मिळवा सुटका; फॉलो करा या ५ सोप्या हेअर केअर टिप्स

Rahul Gandhi Protest: राहुल गांधी पोलिसांच्या ताब्यात; मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन चिघळलं, PHOTO

Wednesday Horoscope : संयम ठेवा, 5 राशींच्या व्यक्तींचे कामाचे मार्ग मोकळे होणार; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update: बारामती शहर आणि परिसरात अचानक पावसाची हजेरी

Cancer Reasons: कोणतंही व्यसन नसताना कॅन्सर का होतो? जाणून घ्या यामागची ७ महत्त्वाची कारणं

SCROLL FOR NEXT