Meerut Police Raid Saam
देश विदेश

बाहेर कॉम्प्यूटर सेंटरचं पोस्टर, आत वेश्याव्यवसाय; पोलिसांनी तरूणींना रंगेहाथ पकडलं

Meerut Police Raid: मेरठमध्ये संगणक प्रशिक्षण केंद्राच्या आड सुरू असलेला वेश्याव्यवसाय पोलिसांनी उघड केला – ९ महिला, ३ ग्राहक आणि मालकाला अटक.

Bhagyashree Kamble

  • मेरठमध्ये संगणक केंद्राच्या आड वेश्याव्यवसाय सुरू असल्याचं पोलिसांनी उघड केलं

  • ९ महिला, ३ ग्राहक आणि मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं

  • सोशल मीडियाद्वारे ग्राहकांना फोटो पाठवून ऑनलाइन बुकिंग केली जात होती

  • नौचंदी परिसरातील नवी सडक व पीव्हीएस मॉलसमोरील स्पा सेंटरवरही पोलिसांची कारवाई

आतापर्यंत स्पा सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याच्या बातम्या आपण पाहिलं असेल. पण मेरठच्या नौचंदी पोलीस स्टेशन परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी पोलिसांनी एका संगणक केंद्रावर छापा टाकून वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला. बाहेरून या केंद्रावर संगणक प्रशिक्षण आणि नोकरीचा बोर्ड लावलेला होता. परंतु छापा टाकल्यानंतर आतील धक्कादायक दृष्य समोर आले.

पोलिसांनी येथून ९ महिला, ३ ग्राहक आणि केंद्राचे मालक राजबीर सिंग यांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ऑनलाइन मागणीनुसार, येथून मुलींचा पुरवठाही केला जात होता. नौचंदी परिसरातील नई सडक येथील संगणक केंद्राच्या बाहेर बॅनर होते. त्यावर संगणक प्रशिक्षण केंद्र लिहिलं होतं. तसेच लॅपटॉपचाही फोटो होता.

गुप्त माहितीवरून पोलिसांना संगणकाच्या केंद्रात स्पा सेंटर सुरू असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी धाड टाकली. पोलीस पथक आत गेले. तेव्हा त्यांना स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तात्काळ कारवाईला सुरूवात केली.

पोलिसांनी तपास करीत सर्वांना ताब्यात घेतलं. तसेच दोन वाहनांमधून पोलीस ठाण्यात नेण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणी ९ महिल, ३ ग्राहक तसेच केंद्रातील मालकाला ताब्यात घेतलं आहे. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

नई सडकवर कारवाईपूर्वी, पोलीस पथकाने पीव्हीएस मॉलसमोरील एका स्पा सेंटरवरही छापा टाकला होता. आत मुलींचे अश्लील फोटोही होते. पोलिसांच्या तपासात मुलींचे फोटो सोशल मीडियाद्वारे ग्राहकांना पाठवले जात असल्याची माहिती मिळाली होती. त्या आधारे बुकिंग केली जात होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT