Pushkar singh dhami Saam TV
देश विदेश

पुष्कर सिंग धामी निवडणूक हारले तरीही मुख्यमंत्री कसे? काय आहे तरदूत...

निवडणुकीच्या निकालापासून उत्तराखंडच्या (Uttarakhand Assembly Election) राजकारणात पुष्कर सिंह धामी यांच्याच नावाची चर्चा होती.

वृत्तसंस्था

उत्तराखंड: उत्तराखंडमध्ये पुष्कर सिंग धामी यांचा शपथविधी पार पडला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत खतिमा मतदारसंघातून (Khatima seat) निवडणूक हरल्यानंतरही ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री झाले आहेत. सहसा, पक्ष पराभूत उमेदवाराला मुख्यमंत्री किंवा मंत्री बनवत नाही, परंतु उत्तराखंडमध्ये भाजपने पुष्कर सिंह धामी (Pushkar singh dhami) यांना पुन्हा मुख्यमंत्री बनण्यास मान्यता दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. निवडणुकीच्या निकालापासून उत्तराखंडच्या (Uttarakhand Assembly Election) राजकारणात पुष्कर सिंह धामी यांच्याच नावाची चर्चा होती. अशा स्थितीत निवडणूक हरल्यानंतरही कोणत्या नियमानुसार उमेदवाराला मुख्यमंत्री बनता येते, हा प्रश्न सर्वांनाच पडला असेल.

कोणत्या नियमानुसार पराभूत उमेदवारही बनतो मुख्यमंत्री?

संसद टीव्हीमध्ये काम करणारे ज्येष्ठ पत्रकार सूरज मोहन झा म्हणतात की भारतीय संविधानाच्या कलम 164(4) नुसार कोणत्याही व्यक्तीला राज्याचा मुख्यमंत्री बनवता येते, पण त्यासाठी काही अटी आहेत. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला ६ महिन्यांसाठी मुख्यमंत्री बनवता येते. जर त्यांना त्यांचा कार्यकाळ पूर्ण करायचा असेल, तर त्यांना शपथ घेतल्यापासून ६ महिन्यांच्या आत निवडून यावे लागते. राज्याच्या कोणत्या ना कोणत्या विधानसभा मतदारसंघातून विजयी व्हावे लागेल. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पुष्कर सिंह धामी यांना ६ महिन्यांत होणाऱ्या पोटनिवडणुकीत विधानसभा मतदारसंघातून निवडून यावे लागेल.

राज्यात विधानपरिषद असल्यास, त्यांना विधान परिषदेवरही पाठवले जाते. मुख्यमंत्रीही मंत्री असतो, त्यामुळे त्यांनाही हाच नियम लागू होतो. ६ महिन्यांत होणाऱ्या पोटनिवडणुकीत पुष्कर सिंह धामी यांचा पराभव झाला तर त्यांना मुख्यमंत्रिपदाची खुर्ची त्यांना सोडावी लागेल. राजकारणाच्या इतिहासातही असे प्रकरण घडले आहे. गोष्ट 2009 ची आहे, जेव्हा झारखंडचे मुख्यमंत्री शिबू सोरेन तामाड मतदारसंघातून पोटनिवडणुकीत पराभूत झाले होते. यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि झारखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.

पुष्कर सिंह पोटनिवडणूक कुठून लढवणार?

पुष्कर सिंह धामी यांना ६ महिन्यांत पोटनिवडणूक जिंकावी लागेल, असे राज्यघटनेत म्हटले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांना मुख्यमंत्रीपदावर राहण्यासाठी अनेक जागा उपलब्ध होतील. उत्तराखंडच्या 6 आमदारांनी आधीच आपली जागा सोडण्याची तयारी दर्शवली आहे. यामध्ये चंपावतचे आमदार कैलाश गहातोडी, कपकोटचे आमदार सुरेश गदिया आणि अन्य ४ आमदारांचा समावेश आहे. या आमदारांनी पुष्कर सिंह यांना पाठिंबा दिला आहे.

दीदीहाट मतदारसंघाचे आमदार आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते बिशन सिंह चुफाल यांना राज्यसभेवर पाठवले जाऊ शकते, असे बोलले जात आहे. अशाप्रकारे पुष्कर सिंह धामी त्यांच्या जागेवरून निवडणूक लढवू शकतात. तज्ज्ञांचे म्हणणे असे आहे की त्यांच्यासाठी ही जागा सुरक्षित ठरू शकते कारण पोटनिवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यास त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागेल. पुष्कर सिंह धामी यांनी आज पुन्हा उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. डेहराडून येथील परेड ग्राऊंडवर दुपारी अडीच वाजता शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. शपथ घेतल्यानंतर ते उत्तराखंडचे 12वे मुख्यमंत्री बनतील.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री अजित पवार अहिल्यानगरमध्ये दाखल

Pune Rave Party: आधी हॉटेलची रेकी, नंतर आखला एकनाथ खडसेंच्या जावयाला अडविण्याचा डाव; खेवलकरांच्या वकिलांचा धक्कादायक खुलासा

Beed Shocking : बीडमध्ये आणखी एक वैष्णवी जीवाला मुकली, सासरच्या छळाला कंटाळून २० वर्षीय विवाहितेने आयुष्य संपवलं

Rave Vs Party : पार्टी आणि रेव्हमध्ये काय फरक आहे?

Parenting Tips: मुलांना आपले मित्र बनवायचंय? तर फॉलो करा 'या' टिप्स

SCROLL FOR NEXT