Punjabi Singer Daler Mehndi Arrested Sentenced Two Years Jail SAAM TV
देश विदेश

Daler Mehndi Arrested : प्रसिद्ध गायक दलेर मेहंदीला अटक, २ वर्षांची शिक्षा; काय आहे प्रकरण?

प्रसिद्ध पंजाबी गायक दलेर मेहंदी याला दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. जाणून घ्या काय आहे प्रकरण?

Nandkumar Joshi

चंदीगड: प्रसिद्ध पंजाबी गायक दलेर मेहंदी याला मानव तस्करी प्रकरणात अटक केली आहे. पंजाबच्या पतियाळा कोर्टाने मानव तस्करी प्रकरणात त्याला दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. दलेर मेहंदीच्या विरोधात १५ वर्षांपूर्वी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Punjabi Singer Daler Mehndi Arrested)

प्रसिद्ध पंजाबी गायक दलेर मेहंदी (Daler Mehandi) याला मानव तस्करी प्रकरणात दोन वर्षांचा तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. पंजाबच्या पतियाळा कोर्टानं हा निर्णय दिला. १५ वर्षांपूर्वीचं हे प्रकरण आहे. या प्रकरणाच्या सुनावणीवेळी कोर्टानं दलेरला दोषी ठरवलं होतं. त्यानंतर काही वेळातच त्याला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. २००३ मधील हे मानवी तस्करी म्हणजेच कबुतरबाजीचं प्रकरण आहे. या प्रकरणी १५ वर्षांनंतर कोर्टानं (Court) हा निकाल दिला.

कोर्टानं शिक्षा सुनावल्यानंतर पोलिसांनी तात्काळ दलेर मेहंदीला ताब्यात घेतले आहे. २००३ मध्ये बल बेडा गावचा रहिवासी बक्शीश सिंगच्या तक्रारीवरून दलेर मेहंदी, त्याचा भाऊ शमशेर मेहंदी ध्यान सिंग आणि बुलबुल मेहता यांच्याविरोधात परदेशात पाठवण्याच्या नावाखाली फसवणूक करून २० लाख रुपये घेतल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली होती.

कोर्टाच्या निकालानंतर, दलेर मेहंदीला पतियाळाच्या सरकारी रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. दरम्यान, १९ सप्टेंबर २००३ मध्ये शमशेर मेहंदी याच्याविरोधात म्युझिक बँडच्या माध्यमातून बेकायदेशीररित्या काही लोकांना कबुतरबाजीच्या माध्यमातून परदेशात घेऊन जाण्याचा आरोप होता. या प्रकरणी दलेर मेहंदीसह इतरांवर गुन्हा नोंदवण्यात आला होता.

शमशेर मेहंदी, दलेर मेहंदीचा मोठा भाऊ आहे. चौकशीत दलेर मेहंदीचेही नाव आले होते. २००३ मध्ये दलेरविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला होता. १५ वर्षानंतर २०१८मध्ये कनिष्ठ न्यायालयाने त्याला दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. तो निर्णय आता सेशन कोर्टाने कायम ठेवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Boondi Ladoo Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा टेस्टी बुंदी लाडू

Maharashtra Live News Update: जामखेली धरण पूर्ण क्षमतेने भरून झाले ओव्हरफ्लो

Nitesh Rane : विषय थेट अंतरपाटापर्यंत गेला, यांच्यामध्ये नवरदेव कोण अन् नवरी कोण? नितेश राणेंचा खोचक सवाल

Thackeray: पुष्पा ते लाडकी बहीण, मुंबईत ठाकरेंची तोफ धडाडली; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT