Hoshiarpur Bus Accident Saam tv
देश विदेश

Hoshiarpur Bus Accident : अति वेगाने घात केला; प्रवाशांनी भरलेली भरधाव बस उलटली; 8 जणांचा मृत्यू

Hoshiarpur Bus Accident update : पंजाबच्या होशियारपूरमध्ये भीषण अपघात झालाय. या अपघातात एकूण ८ जणांचा मृत्यू झाला.

Vishal Gangurde

Hoshiarpur Bus Accident : पंजाबच्या होशियारपूरमध्ये सोमवारी मोठी दुर्घटना घडली आहे. प्रवाशांनी खचाखच भरलेली बस उलटून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला. तर ३२ जण जखमी झाले. हाजीपूर रोडजवळील सगरा बस स्टँडजवळ हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.

पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रशासनाचे अधिकारी देखील घटनास्थळी पोहोचले. पोलीस आणि स्थानिकांनी मिळून बचाव कार्य सुरु केलं. बसला क्रेनच्या मदतीने उचलून दबललेल्या प्रवाशांना बाहेर काढलं. त्यानंतर जखमी प्रवाशांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं. त्यातील ८ जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं.

दसूहाचे डीएसपी कुलविंदर सिंह यांनी अपघाताच्या घटनेला दुजोरा दिला आहे. बसमध्ये एकूण ३९ प्रवासी होते. मृतांमध्ये मायलेकीचाही समावेश आहे. दसूहा सिव्हिल रुग्णालयातील डॉक्टर मनमोहन सिंह यांनी सांगितलं की, मृतांमध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे. भीषण अपघातात काहींचा जागीच मृत्यू झाला आहे. तर काहींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

बसचा वेग अधिक असल्याने अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. अचानक कार समोर आल्याने बस चालकाचं नियंत्रण सुटलं. त्यानंतर बस उलटली. प्रत्यक्षदर्शीने सांगितलेल्या माहितीनुसार, एकेरी रस्त्यावर बसच्या समोर अचानक कार आली. बस वेगात होती. त्यामुळे बस चालकाला नियंत्रण करण्यास जमलं नाही. बसचा ताबा सुटल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. त्यानंतर बस उलटली.

अपघातानंतर स्थानिक लोक मदतीसाठी धावले. कारमधील प्रवासीही जखमी झाले आहेत. पोलिसांनी बस अपघातातील प्रवाशांचे मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. अपघातात बसचा चालक देखील जखमी झाला आहे.

दुसऱ्या प्रत्यक्षदर्शीच्या डोळ्यासमोरच बस उलटली. या प्रत्यक्षदर्शीच्या जबाबावरून पोलिसांनी तक्रार नोंदवली आहे. अपघातातील जखमी बस चालकावर रुग्णलयात उपचार सुरु आहेत. या अपघातात चालक दोषी आढळल्यास त्याच्यावरही कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : दौंडमध्ये १.४० लाखांचा सिगारेट माल चोरीला, चोरटा सीसीटीव्हीत कैद

Yuzvendra Chahal: युजवेंद्र चहलचा क्रिकेट टीमला अलविदा, पोस्ट पाहून चाहते संभ्रमात

Maharashtra Politics: राज्य दुष्काळाच्या उंबरठ्यावर असताना सरकार अधिकाऱ्यांवर मेहरबान; आलिशान वाहनांमुळे राजकारण तापलं

Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण! १ तोळा इतक्या रुपयांनी स्वस्त; वाचा 24k -22k अन् 18k चे आजचे ताजे दर

ST Bus Rule Change :एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! 1 ऑक्टोबरपासून हा नियम बदलणार; महिला-ज्येष्ठ नागरिकांनी नक्की जाणून घ्या

SCROLL FOR NEXT