Bhagwant Mann - Narendra Modi Saam TV
देश विदेश

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान पंतप्रधान मोदींच्या भेटीला, कारण...

वृत्तसंस्था

पंजाबचे मुख्यमंत्री (Punjab Chief Minister) भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर मान यांची पंतप्रधानांसोबतची ही पहिलीच भेट आहे. भगवंत मान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचीही भेट घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी ट्विट केले होते की त्यांनी पंतप्रधान (Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटण्यासाठी आणि पंजाबशी संबंधित समस्यांवर चर्चा करण्यासाठी वेळ मागितला आहे. आम आदमी पार्टीचे (AAP) नेते भगवंत मान यांचा 16 मार्च रोजी हजारो लोकांच्या उपस्थितीत पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी पार पडला. पंतप्रधानांनीही मान यांचे मुख्यमंत्री झाल्याबद्दल अभिनंदन केले होते. पंजाब विधानसभा निवडणुकीत AAP ने 117 पैकी 92 जागा जिंकल्या आहेत.

पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री भगवंत मान अॅक्शन मोडमध्ये दिसत आहेत. त्यांनी बुधवारी भ्रष्टाचारविरोधी हेल्पलाइन नंबर जारी केला होता. जिथे लोक सरकारी कर्मचार्‍यांशी संबंधित व्हिडिओ शेअर करू शकतात. मान यांनी शहीद दिनानिमित्त हेल्पलाइन क्रमांक जारी केला आणि त्याला "भ्रष्टाचारविरोधी कृती लाइन" असे नाव दिले आहे.

यादरम्यान सीएम मान यांनी एका व्हिडिओ संदेशात म्हटले आहे की, "मी तुम्हाला वचन दिले आहे की 23 मार्च रोजी मी एक फोन नंबर जारी करेन, ज्याला 'भ्रष्टाचारविरोधी कृती लाइन' असे नाव असेल. हा नंबर आहे- 9501200200." कोणी लाच मागितल्यास त्याचा व्हिडिओ या क्रमांकावर पाठवा, असे त्यांनी जनतेला सांगितले होते. मान म्हणाले, “आमचे कर्मचारी व्हिडिओची चौकशी करतील आणि दोषी आढळल्यास अधिकारी, मंत्री किंवा आमदार असो त्यांच्यावर कारवाई केली जाईल. या मोहिमेसाठी मला तीन कोटी पंजाबींची गरज आहे. तुम्ही साथ दिल्यास महिनाभरात पंजाबला भ्रष्टाचारमुक्त करू.

CM मान भरणार 25,000 रिक्त पदे

मुख्यमंत्री भगवंत मान यांनी शनिवारी त्यांच्या मंत्रिमंडळाची पहिली बैठक घेतली. या बैठकीत पहिल्या निर्णयानुसार पोलिस विभागातील 10 हजार पदांसह राज्य शासनाच्या विविध विभागातील 25 हजार रिक्त पदे भरण्यास मान्यता देण्यात आली. पहिली बैठक घेतल्यानंतर त्यांनी व्हिडिओ संदेशात हा निर्णय जाहीर केला. महिनाभरात या नोकऱ्यांसाठी जाहिरात आणि अधिसूचना काढण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल, असे ते म्हणाले. ते म्हणाले, "येत्या काही दिवसांत आम्ही आमच्या उर्वरित निवडणूक आश्वासने पूर्ण करू." त्यानंतर मंगळवारी मुख्यमंत्री भगवंत मान यांनी गट क आणि गट ड च्या सुमारे 35 हजार अस्थायी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकऱ्या देण्याची घोषणा केली आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

SCROLL FOR NEXT