Punjab Accident: 8 Mgnrega Workers Killed In Sangrur saam tv
देश विदेश

Punjab Accident: भरधाव कारनं मनरेगा मजुरांना चिरडलं; 8 जणांचा जागीच मृत्यू

Speeding Car Runs Over MGNREGA Workers: मिळालेल्या माहितीनुसार, मनरेगा योजनेंतर्गत सुमारे २३ मजूर रस्त्यावर काम करत होते. त्याचवेळी भरधाव वेगाने आलेल्या कारने मजुरांना धडक दिली. यात ८ जणांचा मृत्यू झालाय.

Bharat Jadhav

  • पंजाबमधील संगरूर जिल्ह्यातील लहरागागा येथे भीषण रस्ते अपघात

  • मनरेगा योजनेंतर्गत रस्त्यावर काम करणाऱ्या मजुरांना भरधाव कारची धडक

  • सुमारे २३ मजूर घटनास्थळी काम करत असल्याची माहिती.

पंजाबमधील संगरूर जिल्ह्यातील लहरागागा येथे एका भरधाव कारनं मजुरांना चिरडल्याची घटना घडलीय. या भीषण अपघातात आठ कामगारांचा मृत्यू झालाय तर अनेक जण गंभीर जखमी झालेत. घटनेनंतर घटनास्थळी आरडाओरड आणि किंकाळ्यांच्या आवाजाने परिसर दणाणला. हाती आलेल्या माहितीनुसार मनरेगा (MGNREGA) योजनेअंतर्गत सुमारे २३ मजूर रस्त्यावर काम करत होते. त्याचवेळी अचानक भरधाव वेगाने आलेल्या एका कारने त्यापैकी अनेकांना धडक दिली.

अपघातात जखमी झालेल्या कामगारांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. मृतांची नेमकी संख्या आणि जखमींची प्रकृती यांबाबत अधिकृत दुजोरा मिळणे अजून बाकी आहे. अपघाताच्या या घटनेनंतर घटनास्थळी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. दरम्यान घटनास्थळी पोलीस कर्मचारी वेळेवर न आल्यानं स्थानिक रहिवशी संतप्त झालेत.

वेळेवर रुग्णवाहिका न आल्यानं जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी केलेल्या व्यवस्था आणि घटनास्थळी राबवण्यात आलेल्या एकूण मदतकार्याबद्दल चिंता व्यक्त केली. सध्याच्या अहवालांनुसार, या अपघातात सुमारे ८ जणांचा मृत्यू झालाय. मात्र, मृतांची संख्या, जखमींची एकूण संख्या आणि या घटनेशी संबंधित इतर तपशीलांबाबत अधिकृत पुष्टी मिळाली नाहीये.

अपघाताबाबत पोलीस अधीक्षक काय म्हणाले?

संगरूरचे पोलीस अधीक्षक पलविंदर सिंग चिम्मा यांनी या दुर्घटनेबाबत सांगितले की, लेहरागागा-जाखल मार्गावर अपघात घडला आहे. भरधाव वेगाने आलेल्या एका वाहनाने मनरेगा (MGNREGA) योजनेअंतर्गत काम करणाऱ्या मजुरांना चिरडले. आतापर्यंत पाच मृतदेह सापडलेत. रुग्णालयातून आणखी काही जणांच्या मृत्यूची माहिती मिळाली असून, सध्या त्याची पडताळणी केली जातेय.

त्यांनी सांगितले की, ज्यांचा मृत्यू झाला आहे किंवा जे जखमी झाले आहेत, त्यांच्याबद्दलची माहिती गोळा केली जातेय. ग्रामस्थांनाही विनंती करण्यात आली आहे की, त्यांनी मृतांची ओळख पटवण्यासाठी आणि इतर संबंधित तपशील पुरवण्यासाठी मदत करावी. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी केली जाईल. पोलीस अधीक्षक पलविंदर सिंग चिम्मा यांनी सांगितले की, पोलीस पथके कार चालकाच्या ओळख पटवण्याचे काम करत आहेत. अपघात घडला त्यावेळी त्या ठिकाणी सुमारे २४-२५ लोक काम करत होते. या अपघातात एखादा दुचाकीस्वारही जखमी झाल्याचं सांगितलं जातंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'टेस्ला'च्या फ्लाईँग कारवर मीम्स व्हायरल, मस्क यांच्या निर्मितीला भारतीयांची मिश्किल दाद

बाळूमामाची शपथ मोडल्यास ब्रेन स्ट्रोक, गोकुळ'च्या निवडणुकीत अंधश्रद्धेचा बाजार

अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर १० राऊंड फायरिंग; 2 जण गंभीर जखमी, सिनेसृष्टीत खळबळ

बारामतीत बड्या उद्योजकावर भीषण हल्ला! शहरात खळबळ

Maharashtra News Live Update: मुंबईत गॅंगवॉर खपवूनन घेतला जाणार नाही- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

SCROLL FOR NEXT