Allahabad University  Saam TV
देश विदेश

अलाहाबाद विद्यापीठात फी वाढीविरोधातील आंदोलनाला हिंसक वळण, गोळीबार झाल्याने एकच खळबळ

विद्यापीठातील विद्यार्थी नेत्यांनी अलाहाबाद विद्यापीठाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याचा आरोप केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

लखनौ : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) अलाहाबाद विद्यापीठात विद्यार्थी नेता आणि सुरक्षारक्षक यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली आहे. किरकोळ वादानंतर दोघांमध्ये हाणामारी झाली. यादरम्यान गोळीबार झाल्याची माहिती देखील समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विद्यापीठातील विद्यार्थी नेत्यांनी अलाहाबाद विद्यापीठाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हल्ला केल्याचा आरोप केला आहे.

विद्यार्थी आणि रक्षक यांच्यात झालेल्या या मारामारीत अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये दगडफेक झाली. त्याचवेळी विद्यापीठातील सुरक्षा रक्षकांवर गोळीबार केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. (Latest Marathi News)

हाणामारीत जाळपोळीची घटनाही समोर आली आहे. यामध्ये कॅम्पसचीही तोडफोड झाली आहे, अनेक वाहने जाळण्यात आली. कॅम्पसमध्ये उपस्थित असलेल्या वाहनांच्या काचाही फोडण्यात आल्या.

सुट्टीच्या दिवशीही विद्यार्थी विद्यापीठाच्या इमारतीचे कुलूप उघडण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या सुरक्षारक्षकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र विद्यार्थी देखील ऐकायला तयार नव्हते यावरुन हा वाद सुरू झाला. काही वेळातच या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांनी फी वाढीविरोधात अलाहाबाद विद्यापीठ परिसरात निदर्शने केली. यावेळी आंदोलकांनी मोटारसायकल जाळली, कारचे नुकसान केले. उत्तर प्रदेशचे एडीजी प्रशांत कुमार यांनी सांगितले की, परिस्थिती आता नियंत्रणात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला मोठा झटका, थेट नोटीस पाठवली, सुनावणीत काय घडलं?

Shraddha ritual: श्राद्धाच्या दिवशी कावळा आला तर ते अन्न कोणाला द्याल? जाणून घ्या नियम

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

SCROLL FOR NEXT