Priyanka Gandhi's aggressive avatar during the protest against Gyanesh Kumar saam tv
देश विदेश

दिल्लीच्या रस्त्यांवर प्रियंका गांधींचा 'रुद्रावतार', 'इंदिरा इज बॅक', सोशल मीडियावर नवा ट्रेंड

Priyanka Gandhi Confronts Police During Opposition: दिल्लीतील आंदोलनात प्रियंका गांधींचा रुद्र अवतार पाहायला मिळाला... त्यामुळे सोशल मीडियावर प्रियंका गांधींची तुलना थेट इंदिरा गांधींशी होतेय...नेमकं प्रियंका गांधी आंदोलनात कशा आक्रमक झालेत...पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

गेल्या तीन दिवसांपासून दिल्लीच्या रस्त्यांवर विरोधकांनी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार पुकारला... विरोधी पक्षनेते राहुल गांधींची सावली बनून प्रियंका गांधीही या आंदोलनात सहभागी झाल्या...पोलिसांची अडवणूक, कार्यकर्त्यांवरील कारवाई आणि अटकेच्या कारवाईनंतरही मागे न हटता प्रियंका गांधींनी आपला रुद्रावतार दाखवत केंद्र सरकारला थेट आव्हान दिलयं...

हा व्हि़डिओ पाहा...एका सर्वसामान्य कार्यकर्त्यावरील पोलिस कारवाई रोखण्यासाठी प्रियंका गांधी ढाल बनून समोर आल्या...आणि भारताच्या तिंरग्याला लाठी म्हणणाऱ्या पोलिसाला चांगलेच खडेबोल सुनावले...

दरम्यान भाऊ राहुल गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर याचं प्रियंका गांधी थेट किंग्जवे कॅम्प पोलीस ठाण्यात पोहचल्या... भावासोबत स्वत:ही जेलमध्ये जाण्याची तयारी दाखवत प्रियंकांनी थेट पोलीस स्टेशनच्या गेटवर चढून पोलीस कारवाईला थेट आव्हान दिलं...

दुसऱ्या दिवशीही प्रियंका गांधींचा हा रुद्रावतार पुन्हा पाहायला मिळाला... पोलीसांनी जंतरमंतरकडे जाणाऱ्या नेत्यांना बॅरिकेड्स लावून रोखल्यावर प्रियंका गांधी खासदारांच्या बसमधून खाली उतरल्या आणि थेट पोलिसांना आव्हान देत...संविधान हातात घेऊन रस्त्यावर झोपून ठिय्या मांडला...

यावेळी प्रियंका गांधींना धक्काबुक्की करणाऱ्यांपासून रोखण्यासाठी थेट राहुल गांधींही पोलिसांवर उखडले...

त्यात प्रियंका गांधींना पोलिसांनी कसंबसं रस्त्यावरून हटवलं...मात्र पोलिसांच्या गाडीत बसवतानाही प्रियंकांनी संविधानाची प्रत हाती घेऊन आंदोलन दडवण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांना उघड पाडलं...

दरम्यान पोलिस स्टेशनमध्ये गेल्यावरही प्रियंका गांधी आणि काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या काही शांत बसल्या नाहीत... प्रियंका गांधीच्या नेतृत्वात पोलीस स्टेशनमध्येच ज्ञानेश कुमारांविरोधात घोषणाबाजी करण्यात केली....

याआधी लखीमपूर खिरी प्रकरणादरम्यान प्रियंका गांधींचा असाच आक्रमक अवतार देशानं पाहिला होता. आता पुन्हा एकदा दिल्लीच्या रस्त्यांवर प्रियंका गांधींनी दाखवलेल्या या कणखर बाण्यामुळे काँग्रेस आणि 'इंडिया' आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारलाय...त्यामुळे सोशल मीडियावर इंदिरा इज बॅक असा ट्रेंड सुरु झालाय.. लोकशाही आणि संविधानाच्या मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांशी थेट दोन हात करण्याचा हा आक्रमक अंदाज विरोधकांच्या आंदोलनाला कोणती नवी दिशा देतो, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलयं...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar Earthquake: पालघर पुन्हा भूकंपाच्या धक्क्याने हादरले, नागरिकांची घराबाहेर धाव; परिसरात भीतीचे वातावरण

राहुल गांधींचे बेधडक आंदोलने, आता पर्यंत किती अन् कोणते गुन्हे दाखल? प्रत्येक FIR माझ्यासाठी मेडल'

Friday Horoscope : करिअरमध्ये नवी संधी अन् बक्कळ कमाई, 'या' ५ राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट, वाचा शुक्रवारचं राशिभविष्य

Almonds vs Pistachios for Heart: बदाम की पिस्ता, हेल्दी हार्टसाठी कोणतं ड्रायफ्रुट बेस्ट?

Weather Update: वादळासह मुसळधार पाऊस; मॉन्सून परतीच्या काळात हवामान विभागाचा 14 राज्यांसाठी अलर्ट

SCROLL FOR NEXT