Priyanka Gandhi Meet Wrestler Saam Tv
देश विदेश

Priyanka Gandhi Meet Wrestlers: प्रियंका गांधी यांनी घेतली महिला पहिलवानांची भेट; ब्रिजभूषण सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी

Delhi News: दिल्लीच्या जंतरमंतरवर कुस्तीपटूंचा संप सातव्या दिवशीही सुरूच आहे.

Shivaji Kale

Delhi Priyanka Gandhi News: दिल्लीच्या जंतरमंतरवर कुस्तीपटूंचा संप सातव्या दिवशीही सुरूच आहे. आज या आंदोलकांशी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी भेट घेतली. यावेळी प्रियंका गांधी यांनी विनेश, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्याशी बातचीत केली. प्रियंका गांधी जवळ जवळ अर्धा तास या आंदोलकांसोबत आंदोलनाच्या ठिकाणी बसून होत्या.  (Latest Marathi News)

प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) म्हणाल्या, 'दोन एफआयआर नोंदवण्यात आले आहेत, ज्याची प्रत अद्याप मिळालेली नाही, जेणेकरून त्यात कोणत्या कलमांचा समावेश आहे हे कळू शकेल. एफआयआर नोंदवला असेल तर दाखवावा. ब्रिजभूषण सिंह यांच्यावर अनेक गंभीर आरोप आहेत. ते पदावर असताना चौकशी करणे शक्य नाही, त्यामुळे त्यांनी आधी राजीनामा द्यावा. (Delhi News)

यादरम्यान काँग्रेस (Congress) नेते दीपेंद्र हुड्डाही दिसले आणि त्यांनी खेळाडूंशी संवादही साधला. दुसरीकडे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) देखील आज दुपारी 4 वाजता खेळाडूंना भेटणार आहेत. शुक्रवारीच आप नेते आतिशी आणि सौरभ भारद्वाज यांनीही खेळाडूंची भेट घेतली होती.

ब्रिजभूषण यांच्यावर एफआयआर दाखल

दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी भारतीय कुस्ती महासंघाचे प्रमुख ब्रिजभूषण सिंह यांच्याविरुद्ध महिला कुस्तीपटूंनी लावलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांसंदर्भात दोन एफआयआर नोंदवले.

महिला कुस्तीपटूंकडून करण्यात आलेल्या तक्रारींच्या आधारे कॅनॉट प्लेस पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या एफआयआरमध्ये गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

अल्पवयीन मुलीचं शोषण केल्याप्रकरणी पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरा गुन्हा 6 महिला पहिलवानांचं शोषण केल्याप्रकरणी दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगरला येऊन फक्त षडयंत्र केलं जातंय- मनोज जरांगे

Rajpal Yadav: ५ कोटी जमा करा, नाहीतर सरेंडर करा; राजपाल यादवला सुप्रीम कोर्टाचा दणका

Ration Card: ३ आठवड्यात हे काम कराच, अन्यथा तुमचे रेशनकार्ड अचानक बंद होणार

मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट सोशल अकाऊंट, होमगार्डला अटक; जळगाव कनेक्शन आले समोर

Pune News: दहीहंडीत अश्लील नृत्य, पुण्यात डान्सर निशा मुंबईकर अन् शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

SCROLL FOR NEXT