प्रेम असावं तर असं! जपानच्या राजकुमारीने केले सामान्य मुलाशी लग्न Saam Tv
देश विदेश

प्रेम असावं तर असं! जपानच्या राजकुमारीने केले सामान्य मुलाशी लग्न

जपानच्या राजकुमारीने घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

वृत्तसंस्था

टोकियो - जपानची Japan राजकुमारी Princess माको हिने कोट्यवधींची संपत्ती सोडत आपल्या प्रियकरासोबत लग्न Marriage करण्याचा निर्णय घेतला आहे. जपानच्या राजकुमारीचा प्रियकर हा राजघराण्यातील Prince नसून एक सामान्य नागरिक आहे. जपानच्या राजकुमारीने घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हे देखील पहा -

केई कोमुरो याने राजकुमारी माकोला डिसेंबर २०१३ मध्ये लग्नाची मागणी घातली. वर्ष २०१७ मध्ये माकोने नोव्हेंबर २०१८ मध्ये लग्न करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर पुन्हा २०२० पर्यंत लग्न स्थगित करत असल्याची घोषणा केली. राजकुमारीने केई कोमुरो सोबत लग्न करण्यासाठी लग्नाचे सात प्रस्ताव फेटाळले असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

राजकुमारी माको ही जपानचे राजे नारुहितो यांचे बंधू राजकुमार आकिशिनो यांची मुलगी आहे. प्रियकर कोमुरो याच्यासोबत राजकुमारीने लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. लग्नानंतर दोघेही अमेरिकेतच स्थायिक होणार आहेत. असे असले तरी या लग्नाबाबद मात्र, राजघराण्याकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.राजकुमारी माको हिला राजघराण्याबाहेर लग्न करणार म्हणून तिच्या कुटुंबाकडून जवळपास ९.१० कोटी रुपये देण्यात येणार होते. मात्र, माकोने ही रक्कम घेण्यास नकार दिला असल्याची माहिती देण्यात आली आहे .राजकुमारी माको आणि तिचा प्रियकर कोमुरो हे दोघेही अमेरिकेत कायद्याचे शिक्षण घेत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Car Accident: प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारचा भीषण अपघात; चित्रपटाच्या प्रमोशनवरून परतत येताना घडली घटना

35000 ची मागणी, 30 हजारांत मांडवली; भंगारवाल्याकडून पोलिस चौकीतच लाच घेताना हवालदारांला रंगेहाथ पकडलं

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

SCROLL FOR NEXT