LPG Price Hike
LPG Price Hike Saam Tv
देश विदेश

महागाईचा आणखी एक झटका; एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - महागाईतून दिलासा मिळण्याच्या आशेवर असलेल्या लोकांना पुन्हा एकदा झटका बसला आहे. मे महिन्याच्या सुरुवातीलाच महागाईचा आणखी एक झटका सर्वसामान्यांना बसला आहे. LPG सिलिंडरच्या (Cylinder) किंमतीत आज म्हणजेच 1 मे रोजी 100 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. प्रति सिलिंडर 104 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र ही दर वाढ घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात झाली नसून ती व्यावसायिक सिलिंडरच्या दरात करण्यात आली आहे.

घरगुती सिलिंडरच्या दरात सध्या कोणताही बदल करण्यात आलेला नसून दर स्थिर आहेत. गेल्या महिन्यात म्हणजे 1 एप्रिल रोजी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती 250 रुपयांनी वाढल्या होत्या. तर आज पुन्हा एकदा व्यवसायिक सिलिंडर 104 रुपयांनी महागला आहे. नव्या दरानुसार आता व्यवसायिक सिलिंडरसाठी प्रति सिलिंडर 2,355 रुपया मोजावे लागणार आहे.

हे देखील पाहा -

19 किलोचा एलपीजी सिलिंडर महागला

IOC नुसार, आज दिल्लीत 19 किलोचा LPG सिलेंडर रिफिल करायचा असेल तर तुम्हाला 2355.50 रुपये द्यावे लागतील. 30 एप्रिलपर्यंत याच सिलेंडरसाठी 2253 रुपये मोजावे लागत होते. त्याचबरोबर कोलकात्यात 2351 ऐवजी 2455 रुपये, मुंबईत 2205 ऐवजी 2307 रुपये खर्च करावे लागणार आहेत. चेन्नई, तामिळनाडूमध्ये व्यावसायिक सिलिंडरच्या किंमती 2406 रुपयांवरून 2508 रुपयांपर्यंत वाढल्या आहेत. या दरवाढमुळे आता हॉटेलमधील जेवण देखील महाग होणार आहे.

1 मे रोजी घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत

मुंबई - 949.50 रु

दिल्ली - 949.50 रु

कोलकाता - 976 रु

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चुकूनही करू नका 'हे' काम; नाहीतर येतील आर्थिक अडचणी

Maruti Suzuki च्या या कारवर मिळत आहे 58000 रुपयांची सूट, 34kmpl चा देते मायलेज

iQOO Neo 9s Pro जबरदस्त प्रोसेसरसह भारतात होणार लॉन्च, मिळणार जबरदस्त फीचर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra Politics: सत्तेसाठी भाजप आणि काँग्रेसचा छुपा समझौता, सुजात आंबेडकरांचा आरोप

Beed News: 3 वर्ष महाविकास आघाडीच्या सरकारने रेल्वेचा पावणेचारशे कोटींचा निधी अडवला, प्रीतम मुंडेंचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT