Election Commission of India Saam Tv
देश विदेश

President Election: राष्ट्रपतीपदासाठी निवडणुकीची होणार घोषणा; निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद

निवडणूक आयोग आज दुपारी ३ वाजता राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भात महत्त्वाची घोषणा करणार आहे अशी माहिती मिळत आहे.

वृत्तसंस्था

निवडणूक आयोग (Election Commission) आज दुपारी ३ वाजता राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भात (President Election) महत्त्वाची घोषणा करणार आहे अशी माहिती मिळत आहे. राष्ट्रपती राम नाथ कोविंद (Ram Nath Kovind) यांचा कार्यकाळ येत्या 24 जुलै रोजी संपत आहे. म्हणून त्यापूर्वी पुढील राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी निवडणूक होणे आवश्यक आहे.

संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांव्यतिरिक्त, सर्व राज्यांच्या विधानसभांचे निवडून आलेले सदस्य, राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली आणि केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान करू शकतात.

शेवटची निवडणूक 2017 मध्ये झाली होती;

राज्यसभा, लोकसभा किंवा विधानसभेच्या नामनिर्देशित सदस्यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार नाही. त्याचप्रमाणे राज्यांच्या विधान परिषदेच्या सदस्यांनाही राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाग घेण्याचा अधिकार नाही. तर, 2017 मध्ये राष्ट्रपती निवडणुकीसाठी 17 जुलै रोजी मतदान झाले होते आणि 20 जुलै रोजी मतमोजणी झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kharadi Rave Party: पार्टीत ड्रग्ज सापडलं..;पुण्यातील रेव्ह पार्टीवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

गाणं लावण्यावरून वाद; शिंदेंच्या नेत्याकडून तरूणावर प्राणघातक हल्ला, काळंनिळं होईपर्यंत मारलं

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT