President Election 2022 Saam Tv
देश विदेश

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत 'आप'चे ठरले; या उमेदवाराला देणार पाठिंबा

देशात सध्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची चर्चा सुरू आहे.

साम वृत्तसंथा

नवी दिल्ली: देशात सध्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची (Election) चर्चा सुरू आहे. भारतीय जनता पार्टीने झारखंडच्या माजी राज्यापाल द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली आहे. तर विरोधी पक्षांनी यशवंत सिन्हा यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात आज दिल्लीत आम आदमी पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक झाली. समितीचे सर्व ११ सदस्य मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सिव्हिल लाईन्स येथील निवासस्थानी उपस्थित होते. या बैठकीत राष्ट्रपतीपदासाठी कोणाला पाठिंबा द्यायाचा यावर चर्चा झाली.

या बैठकीत यशवंत सिन्हा यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत (Election) पाठिंबा देण्याची घोषणा करण्यात आली. मुख्यमंत्र अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, संजय सिंग, गोपाल राय, आतिशी, एनडी गुप्ता, दुर्गेश पाठक, पंकज गुप्ता, राघव चढ्ढा, इम्रान हुसैन आणि राखी बिर्लन यांच्यासह सर्व ११ पीएसी सदस्य या बैठकीत उपस्थित होते.

आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी एक निवेदन जारी केले आहे. "आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या राजकीय समितीची बैठक झाली. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना आम्ही पाठिंबा देऊ, असा निर्णय बैठकीत एकमताने घेण्यात आला. आम्ही एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचाही आदर करतो, पण आमच्या पक्षाचे आमदार, खासदार, सर्वजण १८ तारखेला यशवंत सिन्हा यांना मतदान करतील, असं या निवेदनात म्हटले आहे.

राष्ट्रपती निवडणुकीसाठी 'आप'ची स्थिती

दिल्लीत आम आदमी पक्षाचे ६२ आमदार

पंजाबमध्ये ९२ आमदार आहेत.

गोव्यात २ आमदार.

'आप'चे राज्यसभेत १० खासदार आहेत.

पंजाब विधानसभा निवडणुकीतील (Election) विजयानंतर भगवंत मान यांना मुख्यमंत्री पदावर बसवण्यात आले. त्याआधी भगवंत मान पंजाबच्या संगरूर लोकसभा मतदारसंघातून खासदार होते. त्यांनी जागा सोडताच 'आप'च्या लोकसभेतील खासदारांची संख्या कमी झाली. संगरूर लोकसभा मतदारसंघात आम आदमी पक्षाच्या उमेदवाराचा शिरोमणी अकाली दलाच्या उमेदवाराने पराभव केला. पंजाबमधील आप आणि मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासाठी हा मोठा धक्का होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red hammer in train: ट्रेनमध्ये असलेला लाल हातोडा नेमका कशासाठी? 99% प्रवाशांना माहीत नाही खरं कारण!

Married Life : नवरा-बायकोत सतत भांडण होतंय? बेडरूममधील या चुका असू शकतात कारणीभूत

Homemade Alshi Gel: नॅचरल ग्लो आणि सिल्की केसांसाठी घरी बनवा 'हा' जेल; 2 आठवड्यात दिसेल फरक

Maharashtra News Live Update: राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मानहानी प्रकरणातील समन्स रद्द करण्याची याचिका फेटाळली

एकनाथ शिंदेंनी लवकर शहाणे व्हावे, अन्यथा एका फटक्यात संपतील - जरांगेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT