pregnant women 22 January Birth of babies Saam TV
देश विदेश

Shocking News: २२ जानेवारीलाच बाळाचा जन्म व्हायला हवा; गर्भवती महिलांचा डॉक्टरांकडे हट्ट, कारण काय?

22 January Birth of babies: महिलांचा हा हट्ट पाहून डॉक्टरही चक्रावून गेले आहेत. अनेक ठिकाणी रुग्णालयात गर्दी वाढत असल्याने डॉक्टरांचं टेन्शन वाढलं आहे.

Satish Daud

22 January babies Delivery

२२ जानेवारी हा शुभ दिवस असून याच दिवशी आम्हाला बाळाला जन्म द्यायचा आहे, अशी इच्छा देशातील अनेक गर्भवती महिलांनी डॉक्टरांकडे व्यक्त केली आहे. सिझेरियन पद्धतीने का होईना आमची प्रसुती करा अन् बाळाला जन्माला घाला, अशी विनंती अनेक दाम्पत्य करीत आहेत.

महिलांचा हा हट्ट पाहून डॉक्टरही चक्रावून गेले आहेत. अनेक ठिकाणी रुग्णालयात गर्दी वाढत असल्याने डॉक्टरांचं टेन्शन वाढलं आहे. महिलांच्या या मागणीचं कारणंही तसंच आहे. कारण, २२ जानेवारी हा दिवस संपूर्ण देशासाठी खूपच खास असणार आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर राम मंदिराचे उद्घाटन होणार असून रामल्ला मंदिरात विराजमान होणार आहेत. त्यामुळे हा दिवस आपल्या कुटुंबासाठी आणखीच अविस्मरणीय व्हावा, अशी अपेक्षा अनेक महिलांनी व्यक्त केली आहे. (Latest Marathi News)

सुरुवातीला २२ जानेवारीला बाळाच्या जन्माची मागणी फक्त उत्तर प्रदेशातील गर्भवती महिलांकडून केली जात होती. मात्र, जसजसा हा दिवस जवळ येत आहे, तसतशी ही मागणी आता देशभरातील महिलांकडून होत असल्याचं डॉक्टरांकडून सांगितलं जातंय.

दरम्यान, २२ जानेवारीला प्रसुती व्हावी, यासाठी महिलांनी अनेक राज्यांमधील सरकारी रुग्णालयांमध्ये गर्दी केल्याची माहिती आहे. तर काही महिलांना सरकारी रुग्णालयात जागा उपलब्ध न झाल्याने त्यांनी खासगी डॉक्टरांकडे संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे.

एका डॉक्टरांनी नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले की, गर्भवती महिलांना केवळ २२ जानेवारीला केवळ माता व्हायचे नाही, तर आपल्या मुलाचे नाव देखील राम ठेवण्याची इच्छा आहे. दरम्यान, महिलांच्या या हट्टीपणामुळे डॉक्टर देखील तणावाखाली असल्याची माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG, 1st ODI: भारतानं घेतला पराभवाचा बदला; गिल, अक्षर आणि 'सुंदर'च्या खेळीनं टीम इंडियाचा विजय

NDA मध्ये सामील होण्याच्या चर्चेदरम्यान जयंत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; भेटीमागील कारण काय?

MSRTC Bus Fire: खंडाळा घाटात धावत्या पुसद-अकोला एसटी बसला भीषण आग, चालकाच्या प्रसंगावधानाने वाचला 43 प्रवाशांचा जीव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धडका; मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सचा परवाना रद्द

Strait of Hormuz : होर्मुझमध्ये आता 'ट्रम्प टॅक्स', जहाजांवर अमेरिका 20% शुल्क लावणार, इराणचा विरोध

SCROLL FOR NEXT