Marta Temido Resign News
Marta Temido Resign News Wikipedia
देश विदेश

Marta Temido : भारतीय गर्भवती पर्यटकाच्या मृत्यूमुळे पोर्तुगालच्या आरोग्य मंत्र्यांना द्यावा लागला राजीनामा; नेमकं काय आहे प्रकरण?

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

लिस्बनः एका भारतीय गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी पोर्तुगालच्या आरोग्य मंत्री मार्टा टेमिडो (Marta Temido) यांना राजीनामा (Resign) द्यावा लागला आहे. या गर्भवती महिला (Pregnant Women) पर्यटकाला प्रसूती वॉर्डमध्ये जागेअभावी दाखल करता आले नसल्याने तिचा दुर्देवी मृत्यू झाला होता. याचे वृत्त समोर आल्यानंतर काही तासांनी मार्टा टेमिडो यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. गर्भवती असलेल्या ३४ वर्षीय भारतीय महिलेला लिस्बनमधील (Lisbon) हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यारपूर्वीच तिला हृदयविकाराचा झटका आला. (Pregnant Indian tourist dies in Portugal)

हे देखील पाहा -

मीडिया रिपोर्ट्सनुसार, येथील हॉस्पिटल्सच्या मॅटर्निटी वॉर्डमध्ये कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता आहे. याचा फटका तेथील नागरिकांनाही अनेकदा बसत असतो. मात्र, भारतीय महिलेच्या मृत्यूचे प्रकरण सोशल मीडियाद्वारे पसरू लागल्याने पोर्तुगालचे पंतप्रधान अँटोनियो कोस्टा यांनी आरोग्य मंत्री मार्टा टेमिडो यांचा राजीनामा घेतला.

मार्टा टेमिडो या २०१८ पासून पोर्तुगालच्या आरोग्य मंत्री होत्या. आपल्या देशाला कोरोनाच्या भीषण संकटातून यशस्वीपणे बाहेर काढण्याचे श्रेय त्यांना जाते. परंतु मंगळवारी, गर्भवती भारतीय महिलेच्या मृत्यूनंतर सरकारने एका निवेदनात म्हटले आहे की, टेमिडो यांना हे समजले आहे की त्यांना पदावर राहण्याचे कोणतेही कारण नाही. पोर्तुगालच्या लुसा वृत्तसंस्थेनुसार, पंतप्रधान अँटोनियो कोस्टा म्हणाले की, गर्भवती भारतीय महिला पर्यटकाचा मृत्यू ही घटना होती ज्यामुळे डॉ टेमिडो यांनी राजीनामा दिला.

सांता मारिया हॉस्पिटलच्या निओनॅटोलॉजी युनिटमध्ये जागा नव्हती

या घटनेनंतर, पोर्तुगीज सरकारला प्रसूती युनिट्समधील कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचा सामना करण्यासाठी तीव्र टीकेचा सामना करावा लागला. स्थानिक प्रसारमाध्यमांनी सांगितले की, पोर्तुगालच्या राजधानी लिस्बनमध्ये असलेल्या सांता मारिया या सर्वात मोठ्या रुग्णालयाच्या निओनॅटोलॉजी युनिटमध्ये जागा नाही, त्यामुळे गर्भवती पर्यटकाला दाखल करण्यात आले नाही. दुसऱ्या रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

बाळाला वाचवण्यात यश

मृत महिलेच्या बाळाची तब्येत चांगली आहे, महिलेचे तात्काळ सिझेरियन करुन बाळाला बाहेर काढण्यात आले होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. महिलेच्या मृत्यूची चौकशी सुरू करण्यात आली आहे. अलिकडच्या काही महिन्यांत पोर्तुगालमध्ये अशाच प्रकारच्या घटना घडल्या आहेत, ज्यात दोन वेगळ्या बालमृत्यूंचा समावेश आहे. कारण गर्भवती महिलांना एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात हलवताना त्यांना प्रसूतीसाठी बराच विलंब सहन करावा लागत होता. पोर्तुगालमध्ये आरोग्य कर्मचार्‍यांची तीव्र कमतरता आहे, विशेषत: स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्रातील तज्ञ कर्मचारी यांच्या कमतरतेमुळे तेथील सरकारला परदेशातून आरोग्य कर्मचाऱ्यांचे आउटसोर्सिंग (आयात) करावे लागते.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weather Alert: राज्यात पुढील ४ दिवसांत उष्णतेची लाट येणार; मे महिन्याचा पहिला आठवडा 'ताप'दायक ठरणार

Petrol Diesel Rate 29th April 2024: पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल? जाणून घ्या महाराष्ट्रासह राज्यातील आजचे भाव

Narendra Modi: PM मोदींची आज पुण्यात सभा, शहरातील अनेक रस्ते राहणार बंद; वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग कोणते?

Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात दहशतवाद्यांसारखी वागणूक दिली जातेय; आम आदमी पक्षाचा गंभीर आरोप

Amit Shah Fake Video: अमित शहांच्या भाषणाचा बनावट व्हिडीओ व्हायरल; भाजप नेते आक्रमक, पोलिसांत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT