Sonia Gandhi hospitalised SAAM TV
देश विदेश

Sonia Gandhi: मोठी बातमी! सोनिया गांधींचा ‘मॉर्फ’ व्हिडीओ पोस्ट करणारा पोलिसांच्या अटकेत

लता शर्मा यांनी राजस्थानमधील प्रतापगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

साम टिव्ही ब्युरो

Sonia Gandhi: काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांचा 'मॉर्फ' व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सोनिया गांधी यांचा चेहरा 'मॉर्फ' करून तो व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट करण्यात आला होता. (Morph Video)

राजस्थानमधील प्रतापगड पोलिसांनी ही कारवाई केली आहे. बिपिन कुमार सिंह असं आरोपीचं नाव आहे. त्याच्या ट्विटर अकाऊंटवर व्हिडिओ मिळाला आहे. लता शर्मा यांनी राजस्थानमधील प्रतापगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

लता शर्मा यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार पोलीसांचा तपास सुरू होता. अटकेनंतर आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्याला १४ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

ट्विटर अकाऊंटही झालं ब्लॉक

या प्रकरणी प्रतापगडचे पोलीस अधीक्षक अमित कुमार यांनी म्हटलं आहे की, 'सोनिया गांधी यांचा हा व्हिडिओ ट्विटर अकाऊंटवर आल्यानंतर आपोरीला व्हिडिओ हटवण्यास ट्विटरने सांगितले होते. मात्र याकडे आरोपीने दुर्लक्ष केले. ट्विटरकडून त्याला पुन्हा एकद याविषयी इशारा देण्यात आला होता. मात्र दोन्ही वेळेस त्याने दुर्लक्ष केले. त्यामुळे ट्विटरने त्याचं अकाऊंट ब्लॉक केलं. तसेच व्हिडिओ देखील ब्लॉक केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? या उपाय खुलवतील तुमचं हास्य

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

SCROLL FOR NEXT